

पुढारी ऑनालाईन डेस्क : Google कंपनीने Family Link या अॅपसाठी नवीन अपडेट्स दिलेले आहेत. कंपनीने पुनर्रचना केलेले हे अॅप महत्त्वाच्या फिचरवर अधिक चांगले नियंत्रण ठेवण्याविषयी चांगला अनुभव युजर्संना येणार आहे.
या नव्या पुनरर्चनेमधील बदलामुळे स्क्रीन वेळेची मर्यादा, दुसऱ्या अॅपना ब्लॉक करणे आणि मंजूरी देऊन चालू करणे यासारखी वैशिष्ट्ये आता यामध्ये उपलब्ध असणार आहेत. या अॅपमुळे आता पालकांना आता अधिक चांगल्याप्रकारे त्यांच्या मुलांच्या पावलांचा मागोवा घेता येणार आहे.
पुनरर्चना केलेल्या या अॅपमध्ये पालकांना काही महत्त्वाच्या अपडेट्स मिळणार आहेत. ज्यामुळे मुलांवर लक्ष ठेवता येते. आपला मुलगा कोणते अॅप डाउनलोड करतो, त्याने केलेल्या खरेदीबद्दल माहीती, ब्लॉक केलेल्या वेबसाइट पाहत असताना पालकांना एक नोटिफिकेशन येते. नव्या फायदेशीर बाबींचा या नव्या बदलांमध्ये समावेश करण्यात आलेला आहे.
Google च्या Family Link अॅपमध्ये हायलाइट केलेला एक पर्याय आहे. जो पालकांना मुलांच्या अॅपमध्ये काय चालू आहे?, स्क्रीन वेळ आणि इन्स्टॉल केलेले नवे अॅप, या सगळ्याचा स्नॅपशॉट दाखवला जातो. मूले डिव्हाइसचा वापर कसा करत आहेत हे समजून घेण्यात हे नवे अॅप मदत करेल. Google कडून असे सागण्यात आले आहे की, हे नवे अॅप खूप फायदेशीर ठरणार आहेत.
या अॅपमध्ये एक लोकेशन दाखविणारा नकाशाचा पर्याय असणार आहे, ज्यामुळे पालकांना पाल्याचे मोबाईल लोकेशन पाहता येणार आहे. तसेच या अॅपच्य बॅटरी लाईफमध्ये सुधारणा करण्यात आली आहे. या सर्व सुधारणेमुळे पूर्वी सारख्या अडचणींना आता पालकांना सामोरे जावे लागणार नाही.
हेही वाचा