गणिताच्या भीतीचा उठला पोटात गोळा, शाळेवरच टाकतो म्हणे आता बॉम्बगोळा | पुढारी

गणिताच्या भीतीचा उठला पोटात गोळा, शाळेवरच टाकतो म्हणे आता बॉम्बगोळा

अमृतसर; वृत्तसंस्था : गणिताचा पेपर तोंडावर आलेला होता आणि पोटात त्यांच्या भीतीचा गोळाही उठलेला होता. ‘सारख्याला वारके’ विद्यार्थी गोळा झाले आणि शाळेवरच बॉम्बगोळा पडला पाहिजे म्हणण्यापर्यंत त्यांची मजल गेली. आता बॉम्ब आणायचे कोठून? म्हणून मग नवी आयडिया सुचली. बॉम्बगोळ्याची नुसती धमकी तर देताच येईल म्हणून मग हे करण्याचे ठरले… आणि पंजाबातील अमृतसरमधील स्प्रिंग डेल स्कूल बॉम्बने उडवून देण्याची धमकी इन्स्टाग्रामवर धडकली!

या धमकीने एकच खळबळ उडाली खरी; पण पुढे अवघ्या तीनच तासांत पोलिसांनी या प्रकरणाचा उलगडा केला. दोघा विद्यार्थ्यांना व चक्क त्यांच्या वडिलांनाही ताब्यात घेतले. विद्यार्थ्यांनी गणिताच्या पेपरला घाबरून हा प्रताप केल्याची बाब नंतर उजेडात आली. ‘स्प्रिंग डेल स्कूलमध्ये 16 सप्टेंबर 2022 रोजी एक कार्यक्रम आहे. त्यावेळी शाळा बॉम्बने उडवली जाईल,’ असा हा मेसेज होता. मेसेजनंतर शालेय प्रशासन हादरले. तक्रार नोंदविल्यानंतर पोलिसांच्या सायबर शाखेने आरोपींचा छडा लावला. मेसेज ज्या मोबाईलवरून आला, त्याचे सिम एका विद्यार्थ्याच्या वडिलांच्या नावावर होते म्हणून त्यांना अटक करण्यात आली. दुसर्‍या विद्यार्थ्याच्या वडिलांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणात त्यांची नेमकी काय भूमिका होती, त्याचा तपास पोलिस करत आहेत.

संकट लोटणे म्हणजे नवे संकट ओढवून घेणे

येत्या 16 तारखेला दहावीचा गणिताचा पेपर आहे. बॉम्बच्या धमकीने पेपरचे संकट काही काळ पुढे लोटता येईल, असे या विद्यार्थ्यांना
वाटले होते.

Back to top button