Gold Rate Today : सोन्याला झळाळी, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटचा दर | पुढारी

Gold Rate Today : सोन्याला झळाळी, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटचा दर

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : श्रीकृष्ण जन्माष्टमी दिवशी म्हणजे सोमवारी (३० ऑगस्ट) सराफा बाजारात सोने आणि चांदी दरात (Gold Rate Today) तेजी दिसून आली. गेल्या शुक्रवारच्या तुलनेत सोमवारी २४ कॅरेट सोने ३९८ रुपयांनी महागले. यामुळे (Gold Rate Today) सोने प्रति १० ग्रॅम ४७,५४७ रुपयांवर पोहोचले. तर चांदीच्या दरात प्रति किलोमागे ६७२ रुपयांची तेजी दिसून आली.

इंडियन बुलियन अॅंड ज्लेवर्स असोशिएशनच्या माहितीनुसार, ३० ऑगस्ट रोजी २४ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दर ४७,५४७ रुपये, २३ कॅरेट सोने ४७,३५७ रुपये, २२ कॅरेट सोने ४३,५५३ रुपये, १८ कॅरेट सोने ३५,६६० रुपये आणि १४ कॅरेट सोन्याचा दर २७,८१५ रुपयांवर होता. चांदीचा दर प्रति किलो ६३,६१० रुपये होता.

एमसीएक्सवर (MCX) सोने आणि चांदी दरात सोमवारी घसरण झाली. एमसीएक्सवर आज सुरुवातीच्या व्यवहारात गोल्ड फ्यूचर्समध्ये ०.१७ टक्के घसरण झाली. यामुळे सोन्याचा दर प्रति १० ग्रँम ४७,५४६ रुपये आणि चांदीचा दर प्रति किलो ६४,०५० रुपये होता.

देशातील सोन्याच्या दरात १०.७५ टक्के आयात शुल्क आणि ३ टक्के जीएसटीचा समावेश आहे.

बाजारातील तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, एमसीएक्सवर ऑक्टोबर डिलिव्हरी सोन्याच्या दरात वाढ होण्याच्या शक्यता आहे. कारण डॉलरचे मुल्य कमकुवत झाले आहे. यामुळे सोने ४७,७०० रुपयांवर पोहोचू शकते.

दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या स्पॉट दरात काही प्रमाणात तेजी दिसून येत आहे. सोने दरात ०.२ टक्के वाढ झाली असून दर प्रति औंस १,८१९ डॉलरवर पोहोचले आहे.

तर आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीचा दर ०.३ टक्के वाढून प्रति औंस २४.०७ डॉलर आहे. (१ औंस म्हणजे २८.३५ ग्रॅम, १ तोळा म्हणजे १० ग्रॅम).

शुद्ध सोने असे ओळखा?

२४ कॅरेट सोने सर्वांत शुद्ध सोने असते. मात्र दागिने बनविण्यासाठी २२ कॅरेट सोन्याचा वापर केला जातो. त्यात ९१.६६ टक्के सोने असते. दागिन्यांच्या शुद्धतेसाठी हॉलमार्क संबंधित ५ चिन्हे असतात. जर २२ कॅरेट सोन्याचा दागिना असेल तर त्यावर ९१६, २१ कॅरेट दागिन्यावर ८७५ आणि १८ कॅरेट सोन्याच्या दागिन्यावर ७५० असे लिहिलेले असते. जर दागिना १४ कॅरेटचा असेल तर त्यावर ५८५ असे लिहिलेले असते.

हे ही वाचा :

पहा व्हिडिओ : मुलगी क्रिकेट खेळणार म्हणून चिडवले : पण उंचावले तिने नाव कोल्हापूरचे

Back to top button