Misal Pav : कोल्हापुरची झणझणीत मिसळ कशी तयार कराल?

Misal Pav : कोल्हापुरची झणझणीत मिसळ कशी तयार कराल?
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : मिसळ पाव (Misal Pav) म्हंटलं की कोल्हापुरचा झणझणीतपणा जीभेवर तरळतो. एका बाऊलमध्ये मोड आलेली मटकी, त्यावर फरसाण, त्यावर तर्रीदार रस्सा, कांदा आणि लिंबांची फोड, दोन पाव. व्वा मिसळची डिश बघून तोंडाला पाणी सुटलं ना… चला आज आपण कोल्हापुरीची झणझणीत मिसळ कशी बनवतात, हे पाहू…

साहित्य : ५ चमचे काश्मिरी लाल मिरची, २ चमचे धने, १ चमचे बडीशेप, २ कुडी वेलची, १ जायपत्री, १ दालचिनीचा तुकडा, १ दगडफूल, १ चक्रीफूल, ७ कुडी लवंग, ७ मिरे, १० मेथीचे दाणे, २ चमचे तीळ, ४ कप खोबरं.

१ चमचे खसखस, १ इंच आलं, १० कुडी लसूण,१ चमचा मोहरी, १ चमचा जिरे, १ चमचे हिंग, २ कांदे, १ टोमॅटो, १ चमचा हळद, १ चमचा लाल मिरची पावडर, ४ चमचे कोल्हापुरी मिसळ मसाला, २ कप मटकी, ३ कप पाणी, कोथिंबीर, फरसाण, आवश्यकतेनुसार तेल आणि मीठ इत्यादी..

कृती : कोल्हापुरी झणझणीत करायची वरील ३०-३२ पदार्थ लागतात. ही मिसळ बनविण्यासाठी पहिल्यांदा कोल्हापुरी मसाला तयार करून घ्यायचा आहे. आपण जे काही घेतल्यानंतर गॅसवर पॅन ठेवा. पॅन गरम झाल्यानंतर जे काही ४ कप खिसलेले खोबरे घेतलेले टाका.

१) गॅस मध्यम ठेवून त्यात काश्मिरी लाल मिरती टाका. धने, दालचिनी, बडीशेप, वेलची, जायपत्री, जिरे, दगडफूल, चक्रीफूल, लवंग, मिरे, मेथीचे दाणे, तीळ, खसखस, आलं, लसूण पाकळ्या हे सर्व एकत्र करून चांगलं भाजून घ्या.

२) हा सगळा मसाला भाजून झाल्यानंतर त्याला दळून घ्या. तर, अशाप्रकारे तुमचा कोल्हापुरी मसाला तयार झाला. आता प्रत्यक्ष मिसळ बनवायला घेऊ… कडई गॅसवर ठेवा. त्यात तेल टाकून चांगलं गरम करून घ्या. थोडं जास्त तेल वापरा. कारण, कोल्हापुरची तर्री पाहिजे असेल, तर ५ चमचे तेल वापरा.

३) गरम तेलात मोहरी घाला, ती तडतडायला लागली की, जिरे टाका. नंतर हिंग घाला. एकत्रितपणे थोडसं तेलात भाजल्यानंतर त्यात बारीक चिरलेला कांदा घा. त्यानंतर बारीक कापलेला टोमॅटो घाला. तेलाचा तवंग येईपर्यंत (साधारण ५ मिनिटं) ते शिजवून घ्या.

४) हे शिजवून घेतल्यानंतर २ चमचे हळद, १ चमचा लाल मिरची पावडर आणि त्यानंतर कोल्हापुरी मिसळ पाव मसाला घाला. आता मिसळ झणझणीत होण्यासाठी मिसळ मसाला आणि मिरची पावडर थोडी जास्त घाला. सर्व मसाला घालून झाला की, त्यात मटकी घाला. ते सर्व एकत्र करून झाले की, त्यात चवीनुसार मीट टाका.

५) त्यात ३ कप पाणी टाकून पुन्हा चांगलं मिक्स करून घ्या. कडईवर झाकण ठेवून मटकी चांगली शिजवून घ्या. साधारणपणे १० मिनिटांपर्यंत शिजवून घ्या. हे सर्व शिजून झाल्यानंतर त्यावर तर्री यायला सुरूवात होईल. तर्री दिसली की, गॅस बंद करा. त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर टाका.

६) चला तर, तुमची झणझणीत कोल्हापुरी मिसळ (Misal Pav) तयार झाली. आता फक्त एका बाऊलमध्ये फरसाण घ्या. त्यामध्ये आपण तयार केलेला तर्रीदार लालबुंद असा असा कट टाका. त्यावर पुन्हा बारीक चिरलेला कांदा आणि लिंबाची एक फोड ठेवा. एका प्लेटमध्ये तो मिसळने भरलेला बाऊल, दोन पाव… मग, बघताय का… मारा ताव झणझणती कोल्हापुरी मिसळवर!!

पहा व्हिडीडो : बटर चिकनची ही रेसीपी खास तुमच्यासाठी…

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news