MNS : मनसेच्या दहीहंडीला पोलिसांचा मज्जाव; मनसेचे आंदोलन | पुढारी

MNS : मनसेच्या दहीहंडीला पोलिसांचा मज्जाव; मनसेचे आंदोलन

ठाणे, पुढारी वृत्तसेवा : ठाणे पोलिस आयुक्तालय हद्दीत मनाई आदेश लागू करण्यात आला असून कोरोना काळात सण उत्सव साजरे करण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत.  त्यामुळे नियमांचे उल्लंघन करीत दहीहंडीचे आयोजन केल्यास कारवाई करण्यात येईल अशी फौजदारी दंडप्रक्रिया संहिता कलम 149 प्रमाणे नोटीस ठाणे पोलिसांनी मनसे पदाधिकारी व इतरांना चार दिवसांपूर्वी बजावली होती. मात्र, तरी देखील दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा करण्याची भूमिका मनसेने (MNS) घेतली होती.

त्यानुसार दहीहंडी उत्सवाची तयारी मनसेकडून सूरू करण्यात आली. परंतु, सोमवारी सकाळीच नौपाडा पोलिसांनी मनसेच्या दहीहंडी उत्सवाच्या तयारीला मज्जाव केला. पोलिसांनी अडकाव केल्यामुळे मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी उत्सव साजरा करण्याची भूमिका घेत ठाण्यामधील भगवती मैदानामध्ये सकाळपासून आंदोलन सुरु केले.

यावेळी पोलिसांनी अविनाश जाधव यांच्यासह काही मनसे पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतले. दरम्यान, मनसे कायदे व नियम पाळून दहीहंडी उत्सव साजरा करावा असे आवाहन गोविंदा मंडळांना केले असून आम्हाला दहीहंडी उत्सव नियमांचे पालन करुन साजरा करु द्यावा अशी मनसेचे (MNS) मागणी आहे.

पहा व्हिडीओ : ओंकारेश्वर : एक अद्भुत ज्योतिर्लिंग

हे वाचलंत का? 

Back to top button