कार्ल मार्क्स आणि महात्मा फुले यांच्यात काय साम्य आहे? | पुढारी

कार्ल मार्क्स आणि महात्मा फुले यांच्यात काय साम्य आहे?

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतातील मार्क्स महात्मा फुलेंना मानले जाते. तस पाहिलं तर कार्ल मार्क्सचा आणि फुलेंचा कार्यकाळ जवळपास एकच आहे. पण तरीही मार्क्सबद्दल महात्मा फुलेंना काहीही वाचण्यात आले नव्हते. मार्क्सने मांडलेला भौतिकवाद, भांडवलशाहीचा विकास आणि विनाश आणि त्यातून होणारे कामगारांचे शोषण सर्वप्रथम कामगारांना ज्ञात करून दिले होते. ‘दास कॅपिटल’ या ग्रंथातून अधिक विस्तृतपणे मांडले.

कामगार आणि भांडवलदार वर्गातून होणार असलेला वर्ग संघर्ष मार्क्सने स्पष्ट केला होता. यासाठी मार्क्सने कामगार क्रांतीचे स्वरूप स्पष्ट केले. कामगारांनी उठाव करून संघर्ष करावा यावर मार्क्स ठाम होता. ‘जगातील कामगारांनो एक व्हा’ असे म्हणून कामगारांना सशस्त्र मार्ग स्वीकारावा असे सांगितले. मार्क्सच्या वैचारिक मांडणीमुळे सतत देश सोडावे लागतं होते. त्यात त्याला 1843 साली मिळालेला सहकारी फेडरिक एंगेल्सची साथ मिळाली. ‘

मार्क्सचे दृष्टीकोन पाहिले तर मार्क्समधील हिंसा सोडली तर त्याने मांडलेले दृष्टीकोन स्वीकारले असते. पण मार्क्सने माझे पुर्ण समाधान केले नाही’ असे नेहरू म्हणाले होते. मार्क्सच्या निधर्मी पणामुळे नेहरू प्रभावितही झाले होते. ‘धर्म ही अफूची गोळी आहे’ असा स्पष्ट दृष्टीकोन मार्क्सचा होता. मार्क्सच्या वर्ग संघर्षाचा सिध्दांत आणि कामगार क्रांती यांपासून लेनीन ने रशियात क्रांती घडवून आणली आणि झारची सत्ता उलथून टाकली. मात्र तिथे प्रशासकीय अधिकाऱ्यांचा नवा वर्ग निर्माण झाला. आणि मार्क्सचा सिध्दांत तिथे अपूर्ण राहिला.

फुलेंचे विचार आणि मार्क्सचे सिध्दांत यात मोठ्या प्रमाणात साम्य आहे. मार्क्सने जे कामगारांसाठी सिध्दांत मांडले तेच काम फुलेंनी शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी केलं. इंग्रज आणि भटांपासून शेतकऱ्यांचे होणारे शोषण ‘शेतकऱ्यांचा आसूड’, ‘गुलामगिरी’, ‘ब्राम्हणांचे कसब’ यांतून स्पष्टपण मांडले. फुलेंवर थाॅमस पेन आणि ख्रिस्ती धर्मातील मानवतावाद यांचा प्रभाव होता. वर्णव्यवस्था आणि जातीभेद यांवर फुलेंनी प्रामुख्याने आसूड ओढले. मार्क्सला अधिसत्तेकडून त्रास होत होता तोच फुलेंना सांस्कृतिक वर्चस्व असलेल्या भटांकडून झाला.

मार्क्सप्रमाणे फुले निधर्मी नव्हते. त्यांचा कर्मकांडांला विरोध होता. त्यांनी धर्माचा विचार नैतिक व भौतिक दृष्टीने केला. ‘सत्याविना नाही जगी अन्य धर्म’ हाच त्यांचा धर्माबाबत दृष्टीकोन होता. ब्रिटिशांचे राज्य भारतावर आले हे चांगले झाले असले तरी त्यांनी केलेला शेतकर्यांनवरील अन्याय आक्रमक पणे मांडला. सर्वसामान्यांवर होणार्या अन्यायांवर आक्रमक झाले. त्यासाठी ‘मनुमत जाळा असेही ते म्हणतं. महत्त्वाचे म्हणजे स्त्रीया या पुरूषांपेक्षा श्रेष्ठ मानतं. त्यांसाठी त्यांनी शिक्षणाची दारे 1848 साली सर्वप्रथम खुली केली.

फुले आणि मार्क्स यांना त्यांच्या पत्नींची साथही लाभली. मार्क्सचे आर्थिक बाबींमध्ये लक्ष नव्हतं. आयुष्य वाचन आणि लेखन यांत खर्ची घातले. आणि सारखं स्थलांतरित आयुष्य भोगावे लागले. त्यांत त्याची पत्नी जेनीची यथायोग्य साथ मिळाली. तेच फुलेंच्या बाबतीत सावित्रीबाईंनी ज्योतीरावांना साथ दिली. मार्क्स आणि फुले यांच्यात तुरळक फरक असला तरी उद्देश एकच होता. म्हणूनच फुलेंना पाश्चात्य जगतात अभ्यासले जाते त्याप्रमाणे मार्क्सला भारतात अभ्यासले जाते.

हेही वाचलतं का?

Back to top button