पुढारी ऑनलाईन डेस्क :
मुंबै बँक निवडणुक बोगस मजूरप्रकरणी कितीही वेळा बोलवा मी चौकशीला यायला तयार आहे. मात्र राज्य सरकार भाजप नेत्यांना केवळ छळायच्या उद्देशानेच चौकशीसाठी बोलवत आहे, असा आराेप विराेधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी केला.
मुंबै बँक निवडणुक बोगस मजूरप्रकरणी आज पुन्हा एकदा प्रवीण दरेकर यांची चौकशी होणार आहे. याबाबत बाेलताना ते म्हणाले, " राज्य सरकारचा भाजप विराेधात दडपशाहीचा वापर होत आहे. काही नेत्यांना अडकवण्याचा अजेंडा सुरु आहे. सरकारची हे षड्यंत्र जनतेसमाेर लवकरच येईल".
सेव्ह विक्रांत प्रकरणावर किरीट सोमय्यांवर हाेणार आराेप म्हणजे, राऊतांचा साप म्हणून भुई थोपटणे असा अजेंडा आहे, असा टाेलाही त्यांनी लगावला. भाजपवर टीका करणारे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी तीन पक्षाचा संसार कसा सुरळीत चालेल याकडे लक्ष द्यावं, असेही दरेकर म्हणाले.
मानखुर्दमध्ये राडा प्रकणावर बोलताना ते म्हणाले की, शरद पवारांच्या घरावर गेलेला जमाव पाेलिसांकडून नियंत्रित होत नाही, मानखुर्दकडे काय पाहणार? कारवाई ही पोलीस आयुक्त, वरिष्ठ अधिकाऱ्यांवर करावी. आंदोलन प्रकरणी पोलीस आयुक्तांवर कारवाई करा, अशी मागणीही त्यांनी केली.
हेही वाचा