Elon Musk Tweet : ‘एलन मस्क ट्विटर बोर्डमध्‍ये सामील हाेणार नाहीत : सीईओ पराग अग्रवाल यांची माहिती

 एलन मस्क ( संग्रहित छायाचित्र )
एलन मस्क ( संग्रहित छायाचित्र )

पुढारी ऑनलाईन डेस्क :  ट्विटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी  (सीईओ) पराग अग्रवाल (CEO) यांनी आपल्या  ट्विटर अकाउंटवर  एक नोट शेअर केली आहे. एलन मस्क ट्विटर बोर्डमध्‍ये सामील हाेणार नाहीत, असे त्‍यांनी म्‍हटलं आहे.

Elon Musk Tweet : ट्विटरचे सर्वात मोठे शेअरहोल्डर

टेस्ला (Tesla) आणि स्पेसएक्स (SpaceX) कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलन मस्क सक्रिय असतात. ट्विटच्या माध्यमात}d ते युझरशी संवाद साधत असतात. काहीवेळा त्यांचे  ट्विट खूप मजेशीर असतात. काही दिवसांपूर्वी त्‍यांनी ट्विटरचे  ९.२% टक्‍के शेअर्स खरेदी केले होते. त्याची किंमत तब्बल २.८ बिलियन डॉलर इतकी आहे. ते ट्विटरचे सर्वात मोठे शेअरहोल्डर ठरले आहेत. त्यांनी आपल्या ८१ मिलीयन फॉलोअर्स असलेल्या  ट्विटर  अकाउंटवर  ट्विटर संबधित काही पोल घेतले होते.

सीईओ पराग अग्रवाल यांचे ट्विट 

५ एप्रिलला ट्विटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी पराग अग्रवाल (CEO) यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवर ट्विट करत एलन मस्क यांच्या संबधित माहीती दिली. त्‍यांनी ट्विटमध्ये म्हटलं हाेते की, एलन मस्क यांची नुकतीच ट्विटरच्या संचालक मंडळात नियुक्ती झाली आहे. 'आम्ही खुप उत्सुक आहोत, एलन मस्कला आम्ही ट्विटर संचालक मंडळात नियुक्त करत आहोत' या ट्विटला  एलन मस्कनेही रिप्लाय देत म्हंटले होते की, येत्या काही महिन्यात ट्विटरमध्ये लक्षणीय सुधारणा करण्यासाठी पराग आणि ट्विटरशी काम करण्यास उत्सुक आहे.

नियुक्ती दिवशीच नकार 

 ट्विटर बोेर्डमध्ये एलन मस्क सामील हाेणार नाहीत. अशी माहिती ट्विटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी पराग अग्रवाल (CEO) यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवर  ट्विट करत नोट शेअर करत दिली. त्यामध्ये त्यांनी  लिहले आहे की, एलन मस्‍क यांनी आमच्या बोर्डमध्‍ये सामील हाेणार नाही, असा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात काही मिटिंग झाल्या; पण एलन मस्क जॉईन होण्यास इच्छुक नाही आहेत. ते ९ एप्रिलला ट्विटर बोर्डमध्ये सामील होणार होते; पण त्याच दिवशी सकाळी  त्यांनी  सांगितले की, ते  ट्विटर बोर्डमध्‍ये सामील हाेणार नाहीत.

हेही वाचलंत का? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news