आश्रमशाळा आणि वाचनालयाची इमारत बांधण्‍यासाठी पाठपुरावा करणार : गडकरींचे आश्‍वासन | पुढारी

आश्रमशाळा आणि वाचनालयाची इमारत बांधण्‍यासाठी पाठपुरावा करणार : गडकरींचे आश्‍वासन

नागपुर; पुढारी वृत्तसेवा : आमची आश्रमशाळा आणि वाचनालयाची इमारत बांधून द्या आणि शाळेच्या जून्या इमारतीला लागून असलेली ई क्लासची १० एकर जमीन आमच्या प्रकल्पाकरीता द्या, या मागणीकरीता अमरावती जिल्ह्यातील चव्हाळा येथील “प्रश्नचिन्ह’ या आश्रमशाळेच्या विद्यार्थी व पालकांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या घरासमोर आंदोलन केले.

'प्रश्नचिन्ह' www.pudhari.news
‘प्रश्नचिन्ह’ च्या विद्यार्थ्यांचे गडकरींच्या घरासमोर आंदोलन’

नितीन गडकरी यांनी घेतली भेट

अर्धा तास चाललेल्या या आंदोलनात साधारणपणे १०० मुले व ४० ते ५० पालक सहभागी झाले होते. या आंदोलनाची दखल घेत स्वत: नितीन गडकरी यांनी पालक व मुलांची भेट घेऊन त्यांचे म्हणने ऐकून घेतले. या संदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू आणि आपण स्वत: याचा पाठपुरावा करू, असे आश्वासन गडकरींनी दिल्याची माहिती समाजसेविका शिला शिंदे यांनी दिली.

 'प्रश्नचिन्ह' www.pudhari.news

आश्रमशाळेत शिकणाऱ्या मुलांच्या भवितव्याचा प्रश्न

अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील चव्हाळा येथे मतीन भोसले यांनी फासेपारध्यांच्या मुलांसाठी प्रश्नचिन्ह ही आश्रमशाळा सुरू केली.  समृद्धी महामार्ग या आश्रमशाळेजवळून गेल्याने आश्रमशाळा तसेच वाचनालयाची इमारत पाडण्यात आली. याशिवाय पाण्याने तुडुंब भरलेली विहीर, खेळाचे मैदान, दहा शौचायलेही गेली आहेत. यामुळे आश्रमशाळेत शिकणाऱ्या मुलांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्याच्या निषेधार्थ प्रश्नचिन्हमधील पालक व विद्यार्थ्यांनी नितीन गडकरी यांच्या घरासमाेर रस्त्यावरील शाळा आंदोलन केले. सरकारने मुलींकरीता दहा शौचालये व स्नानगृहे बांधून देण्यात यावी, विहीरीसह खेळाचे मैदान बांधून देण्यात यावे आदी मागण्यांकरीता हे आंदोलन करण्यात आले.

हे वाचलं का?

Back to top button