पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय वंशाचे अशोक एलुस्वामी ( Ashok Elluswamy ) हे इलेक्ट्रिक वाहन कंपनीच्या ऑटोपायलट टीमसाठी नियुक्त केलेले पहिले कर्मचारी होते, असा खुलासा टेस्ला कंपनीचे संस्थापक आणि सीईओ एलन मस्क यांनी केला आहे. एलन मस्क यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितले की, अशोक एलुस्वामी हे सध्या ऑटोपायलट इंजिनीअरिंगचे अध्यक्ष आहेत. टेस्लामध्ये येण्यापूर्वी ते फॉक्सवॅगन इलेक्ट्रॉनिक रिसर्च लॅब आणि बॅबको व्हीकल कंट्रोल सिस्टममध्ये कार्यरत होते.
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती अशी ओळख असणारे एलन मस्क यांनी नुकतेच एका ट्वीट केले होते की, टेस्ला कंपनीला सर्वसामान्यांच्या जीवनातील समस्यांवर उत्तर शोधण्यासाठी योगदान देणार्या एका आर्टिफिशियल इंटेलिजन्स (कृत्रीम प्रज्ञा) इंजिनियर हवा आहे. मागील काही वर्ष सोशल मीडियाच्या माध्यामतूनच एलन मस्क हे आपल्या कर्मचार्यांची निवड करतात.
टेस्ला कंपनीच्या ऑटोपायलट टीमची सुरुवात करण्यापूर्वी मी ट्विटरच्या माध्यातून निवड झालेला अशोक एलुस्वामी हा पहिला कर्मचारी होता. आज टेस्लाच्या यशाचे श्रेय लोक मला देतात; पण टेस्ला ऑटोपायलटची टीम खूपच प्रतिभावंत आहे. जगातील खूप हुशार लोक या टीममध्ये आहेत, असेही मस्क यांनी मुलाखतीमध्ये स्पष्ट केले.
भारतीय वंशाचे अशोक एलुस्वामी यांनी चेन्नई येथील कॉलेज ऑफ इंजिनियरिंग ॲण्ड कम्युनिकेशन येथून पदवी घेतली. यानंतर त्यांनी कॉर्नेगी मेलन विद्यापीठात रोबोटिक्स सिस्टम डेव्हलपमेंट अभ्यासक्रमात पदव्युत्तर पदवी संपादित केली आहे.
'ऑटोपायलट'चा अर्थ आहे स्वयंचलित कार जी विनाचालक धावू शकते. ऑटोपायलट तंत्रज्ञान हे वेगवेगळ्या इनपूटच्या आधारे काम करते. या कारमधील नकाशा ( मॅप) उपग्रहाशी (सॅटेलाईट) जोडलेला असतो. नेमके कोठे जायचे आहे? या पर्याची प्रवासी निवड करताे. यानंतर मार्गाची निवड होते. कार ऑटोपायलट मोडवर गेल्यानंतर कारच्या चारी बाजूला असणारे उपग्रहाशी (सॅटेलाईट) जाेडलेले कॅमेरे सूचना करतात. याच सूचनांनुसार कार विनाचालक धावते. तिला अडथळा आला तर ती थांबेल.
हेही वाचलं का?