व्हिडिओ : मुंबई विमानतळावर कोरोना टेस्टिंगमध्ये घोटाळा; भारतीय वंशाच्या नागरिकाचा गंभीर आरोप | पुढारी

व्हिडिओ : मुंबई विमानतळावर कोरोना टेस्टिंगमध्ये घोटाळा; भारतीय वंशाच्या नागरिकाचा गंभीर आरोप

मुंबई; पुढारी ऑनलाईन

मुंबई विमानतळावर करण्यात येणारी कोरोना चाचणी आणि क्वारंटाईन प्रोटोकॉल हा पैसे उकळण्यासाठीचा एक घोटाळा असल्याचा आरोप भारतीय वंशाचे ब्रिटनचे नागरिक मनोज लाडवा यांनी केला आहे. मनोज आणि त्यांच्या पत्नी ह्या त्यांच्या सासऱ्याच्या अंत्यसंस्कारासाठी मुंबईत ३० डिसेंबर रोजी दाखल झाले होते. विमानतळावर केलेल्या चाचणीत मनोज हे कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले होते.

लंडनमधील हिथ्रो विमानतळावर विमान प्रवासापूर्वी केलेल्या चाचणीत त्यांची चाचणी निगेटिव्ह आली होती. पण त्यां मुंबई विमानतळावर दुसऱ्यांदा चाचणी करण्यासाठी विचारणा केली. पण विमानतळ प्रशासनाने त्यासाठी नकार दिला. त्यानंतर त्यांची थेट सरकारी क्वारंटाईन सेंटरमध्ये रवानगी केली. यामुळे अंत्यसंस्काराला आपल्याला जाता आले नसल्याचा दावा मनोज लाडवा यांनी केला.

त्यांनी फेसबुकवर विमानतळावर घडलेल्या प्रकाराचा लाइव्ह व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यांनी विमानतळ प्रशासनाबाबत यातून नाराजी व्यक्त केली आहे. ”माझी मुंबई विमानतळावर नाट्यमयरित्या कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. माझ्यासोबत विमानात आणखी चार लोक प्रवास करत होते. ते सर्व निगेटिव्ह होते. आमची चाचणी निगेटिव्ह असतानाही पॉझिटिव्ह दाखवण्यात आली.” असे लाडवा यांनी म्हटले आहे.

आम्ही सासऱ्यांच्या अंत्यसंस्कारासाठी आलो होतो. २४ तासांपूर्वीच त्यांचे निधन झाले होते. त्यासाठी आम्ही भारतात येण्यासाठी ब्रिटनहून निघाले होतो. पण विमानतळावर हे लोक आमच्याकडून अधिक पैसे उक‍ळण्याचा प्रयत्न करत होते, असाही आरोप त्यांनी केला आहे.

माझी चाचणी निगेटिव्ह असल्याचा सांगण्याचा प्रयत्न केला. पण मुंबई विमानतळावरील प्रशासनाने आपण कोविड पॉझिटिव्ह असल्याचे भासवले. मला स्वतंत्रपणे चाचणी करायची होती. पण त्यांनी त्यासाठी नकार दिला. त्यांनी आपल्याला चार तास विमानतळावर अडवून ठेवल्याचे नमूद केले आहे.

हा एक घोटाळा आहे. विमानात कोविड पॉझिटिव्ह लोकांना विमानात जाऊ दिले, असाही दावा त्यांनी केला आहे. ३ मिनिटे ४३ मिनिटांच्या व्हिडिओ क्लिपमध्ये ते विमानतळ प्रशासनाविरोधात चाचणी तसेच क्वारंटाईन नियमांवरुन संताप व्यक्त करताना दिसून येत आहेत. लाइव्ह व्हिडिओत लोक चाचणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांप्रती संताप व्यक्त करताना दिसत आहेत.

येथे कोणतेही जबाबदारी घेताना दिसत नाही. हा एक घोटाळा आहे आणि यामुळे आमची फसवणूक होत आहे, असा गंभीर आरोप लाडवा यांनी केला आहे.

त्यांनी असा आरोप केला आहे की बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अधिकार्‍यांनी त्यांना धमकी दिली होती की जर त्यांनी मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केले नाही आणि क्वारंटाईन न झाल्यास त्यांना दंड आकारला जाईल.

हे ही वाचा :

पहा व्हिडिओ : नाशिकच्या आदिवासी शेतकऱ्याचे आयुष्य मोगरा शेतीने बनवले सुगंधित

Back to top button