हिंगोली जिल्हा हादरला! एकाच झाडाला दोरीने गळफास घेऊन शेतकरी पती-पत्नीची आत्महत्या

हिंगोली : पुढारी वृत्तसेवा
हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील दाताडा बुद्रुक शिवारामध्ये एका शेतात लिंबाच्या झाडाला दोघेजण गळफास घेतलेल्या अवस्थेमध्ये आढळून आल्यामुळे हिंगोली जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. सदरील घटनाही दाताडा बुद्रुक शिवारामध्ये घडली असून, हा सर्व प्रकार आज सोमवारी सकाळी उघडकीस आला. मयत दोघेही पती-पत्नी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
दोघेही शेतकरी कुटुंबातील असून सेनगाव तालुक्यातल्या वाघजाळी गावचे रहिवासी आहेत. या घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी घटनस्थळी धाव घेत बघण्यासाठी गर्दी केली. त्याचबरोबर सदरील माहितीही पोलिसांना सुद्धा कळविण्यात आली आहे. अद्याप तरी या घटने मागचे कारण समजू शकले नाही. या प्रकरणी पोलिसात अद्याप कुसलीही नोंद झाली नसून, पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलीस तपासाअंती घटनेमागचे खरे कारण कळणार आहे.
हे ही वाचा :
- भुसावळ येथे झालेल्या अपघातात आजीसह नातीचा मृत्यू
- राजकीय रणधुमाळीचे वर्ष
- कोल्हापूर : ‘मोका’ संशयितांचा पोलिसांना चकवा!