अकोला : मोदींनी विदर्भवाद्यांची निराशा केली; नाना पटोले यांची अकोल्यात प्रतिक्रिया | पुढारी

अकोला : मोदींनी विदर्भवाद्यांची निराशा केली; नाना पटोले यांची अकोल्यात प्रतिक्रिया

अकोला; पुढारी वृत्तसेवा : पंतप्रधान नरेंद्र यांच्या कडून विदर्भातील जनतेची मोठी अपेक्षा होती. आज विदर्भातील शेतकरी मोठ्या प्रमाणात आत्महत्या करतोय. येथील प्रकल्प गुजरातला जात आहेत.  दौर्यामुळे कुठलाच फायदा झाला नाही उलट निराशा झाली. आणि पीएम यांच्या दौरांसाठी मोठा खर्च आणि वेळ वाया गेला. तर हा दौरा म्हणजे जनतेला वेठीस धरणारा होता असा आरोप नाना पटोले यांनी येथे केला. कुणबी समाज मेळावा निमित्त ते अकोल्यात आले होते, यावेळी ते प्रसिद्धी माध्यमांशी बोलत होते.

नाना पटोले यांनी महाराष्ट्रातील विविध विषयांसंदर्भात यावेळी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. ते म्हणाले, शाई प्रकरणात त्या पोलीस कर्मचाऱ्यांचा कोणताच दोष नसताना त्यांना विनाकारण निलंबित करण्यात आले आहे. ही कारवाई चुकीची असून त्यांना परत सेवेमध्ये घेण्यात यावे असेही नाना पटोले म्हणाले. तर समृद्धी महामार्गत कुणाची समृद्धी झाली. हा प्रश्न महत्वाचा आहे. काही नेत्यांची आणि अधिकाऱ्यांची समृद्धी झाली असल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला. कोणाची कशी समृद्धी झाली याचे सर्व पुरावे कागदपत्रे माझ्याकडे आहेत. येणाऱ्या काळात बाहेर काढू असा इशारा नाना पटोले यांनी दिला. लोकशाहीमध्ये प्रत्येक समाजाला आपल्या समाजाचे नेतृत्व तसे राहावे असे वाटणे हे काही गैर नाही. कुणबी समाजाने राज्याला नेतृत्व दिले आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे खऱ्या अर्थाने कुणबी होते, असेही नाना म्हणाले.

छत्रपती शिवाजी महाराज यांनी रयतेचे राज्य कसे असावे याचे राज्यालाच नव्हे तर देशाला दिशा देण्याचे काम केले आहे. त्यामुळे समाजाचे नेतृत्व राहावे, ही काळाची गरज आहे. कुणबी समाज हा अन्नदाता आहे, देशाचा पोशिंदा आहे. ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत, त्या तुम्ही करू नका.

कुणबी समाज, ओबीसी समाजामध्ये माझ्यापेक्षाही अनेक नेतृत्व आहेत. प्रत्येकजण समाजाचे देणे लागते. प्रत्येकाची समाजासाठी कार्य करण्याची जबाबदारी असते. माझ्या अपेक्षा काय असतील या पेक्षा माझ्या समाजाच्या व ओबीसी समाजाच्या अपेक्षा काय आहे, यासाठी काम करणे आवश्यक आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पाऊलावर पाऊल ठेवून काम करण्याचा नाना पटोले यांचा प्रयत्न असतो, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.

हेही वाचा

Back to top button