Archery World Cup Shanghai 2024 | चीनमध्ये भारताचा ‘ट्रिपल धमाका’! तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत जिंकली ३ सुवर्णपदके

Archery World Cup Shanghai 2024 | चीनमध्ये भारताचा ‘ट्रिपल धमाका’! तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत जिंकली ३ सुवर्णपदके
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन : चीनमधील शांघाय येथे सुरु असलेल्या तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत भारतीय तिरंदाजांनी शनिवारी इतिहास रचला. भारताने या स्पर्धेत आतापर्यंत तीन सुवर्णपदके जिंकली आहे. तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेच्या स्टेज १ मध्ये ज्योती सुरेखा वेन्नम, आदिती स्वामी आणि परनीत कौर यांच्या महिला कंपाउंड संघाने इटलीचा २३६-२२६ अशा गुणांनी पराभव करत सुवर्णपदक जिंकले. (Archery World Cup Shanghai 2024)

तर अभिषेक वर्मा. प्रथमेश आणि प्रियांश यांच्या पुरुष कपाउंड संघाने नेदरलँड्सचा २३८-२३१ असा पराभव करत सुवर्णपदकाला गवसणी घातली. तर अभिषेक वर्मा आणि ज्योती सुरेखा वेन्नम यांनी स्टेज १ मध्ये मिश्र कंपाउंड स्पर्धेत भारताला तिसरे सुवर्णपदक जिंकून दिले.

रिकर्व्ह विभागातील स्पर्धेची फेरी रविवारी होणार आहे. भारताची तिरंदाज दीपिका कुमारी वैयक्तिक पदकासाठीच्या शर्यतीत आहे. महिलांच्या रिकर्व्ह विभागात तिने उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.

जागतिक क्रमवारीत कधीकाळी नंबर १ राहिलेल्या दीपिका कुमारी हिने उपांत्यपूर्व फेरीत सहाव्या क्रमांकाच्या क्वालिफायर जिओन ह्युनयुंग जियोनला पराभूत करून अंतिम चारमध्ये स्थान मिळवले. ज्यामध्ये चीनमधील गेल्या वर्षीची विजेती लिम सिह्योन, कोरियन नाम सुह्योन आणि ली जियामन यांचा समावेश आहे. (Archery World Cup Shanghai 2024)

"या वर्षात संघात पुनरागमन करताना मला खूप आनंद होत आहे." असे दीपिका कुमारीने म्हटले आहे. दीपिकाची जागतिक क्रमवारीत १४२व्या स्थानापर्यंत घसरण झाली होती. आता तिने पुनरागमन केले आहे. २०२२ मध्ये दीपिका आई झाली होती.

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news