Mahadev Betting App Case : साहिल खान फरार घोषित; अभिनेत्यावर गंभीर आरोप | पुढारी

Mahadev Betting App Case : साहिल खान फरार घोषित; अभिनेत्यावर गंभीर आरोप

पुढारी ऑनलाईन डेस्क : महादेव बेटिंग ॲप प्रकरणी (Mahadev Betting App Case) अभिनेता साहिल खानला फरार घोषित करण्यात आले आहे. यासंदर्भात पोलिस अधिकाऱ्यांनी पुष्टी केली आहे. सत्र न्यायालयाने त्याची अटकपूर्व याचिका फेटाळहोती. गेल्या आठवड्यात शनिवारी साहिल खान मुंबई पोलिसांसमोर हजर झाला होता. एसआयटीने त्याची तब्बल तीन तास चौकशी केली होती. महादेव बेटींग ॲप प्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने यापूर्वी त्याची चौकशी केली होती. या प्रकरणांतर्गत त्याच्यावर गंभीर आरोप आहेत. (Mahadev Betting App Case)

दोन दिवसांपूर्वी, मुंबई उच्च न्यायालयाने त्याला चौकशीसाठी पोलिसांना सहकार्य करण्याचे निर्देश देत त्याची याचिका फेटाळली होती. शुक्रवारी गुन्हे शाखेच्या पथकाने त्याच्या निवासस्थानी भेट दिली होती. तेव्हा तो तिथून बेपत्ता असल्याचे समजले. त्य़ाला शोधूनही तो सापडला नाही. त्यानंतर साहिल खानला फरार घोषित केले गेले.

पोलिस अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, अभिनेत्याने नागरिकांना बेटिंग ॲप वापरण्याचे आवाहन करणाऱ्या जाहिरातींचा प्रचार केला. महादेव ॲपचा प्रचार आणि प्रसार करून मोठा नफा कमावला. त्याची याचिका फेटाळताना न्यायालयानेही या गोष्टींची दखल घेतली होती.

Back to top button