‘माझ्यासोबत राहा, मुलं जन्माला घाल’, दहशतवाद्याने अंगठी देऊन केले होते प्रपोज, Hamas च्या कैदेतील मुलीचा खुलासा | पुढारी

'माझ्यासोबत राहा, मुलं जन्माला घाल', दहशतवाद्याने अंगठी देऊन केले होते प्रपोज, Hamas च्या कैदेतील मुलीचा खुलासा

नवी दिल्‍ली ; पुढारी ऑनलाईन इस्रायल-हमास Hamas युद्धादरम्यान एका इस्रायली मुलीने खुलासा केला आहे की, हमासच्या एका दहशतवाद्याला तिच्याशी लग्‍न करायचे होते. टाईम्‍स ऑफ इस्‍त्रायल च्या म्‍हणण्यानुसार, (१८ वर्षांची) नोगा वीस (Noga Weiss) गेल्‍या वर्षी गाजामध्ये ५० दिवसांपर्यंत हमास दहशतवाद्यांच्या कैदेत राहिली होती. यानंतर एका करारानुसार तिची सुटका करण्यात आली.

माझ्या मुलांना जन्माला घालशील?

नोगा वीस या तरूणीने दावा केला आहे की, बंधक बनवणाऱ्यांपैकी एका Hamas दहशतवाद्याने मला अंगठी देत प्रपोज केले होते. त्‍याने मला म्‍हटले होते की, काय ती नेहमी गाझातच राहील आणि माझ्या मुलांना जन्माला घालेल? नोगाने सांगितले की, त्‍याने लग्‍नासाठी त्‍याच्या आईशी देखील भेट करून दिली होती.

द टाईम्‍स ऑफ इस्‍त्रायलने नोगाच्या हवाल्‍याने सांगितले की, तीने एका मुलाखतीत या घटनेविषयी सर्व सांगितले. तीने म्‍हटले मला हमासच्या Hamas कैदेत १४ दिवस उलटले होते. जेंव्हा त्‍याने मला एक अंगठी दिली आणि म्‍हटले, ‘सर्वांना सोडून देण्यात येणार आहे, मात्र तू इथेच माझ्‍यासोबत राहशील आणि माझ्‍या मुलांना जन्माला घालशील.’

जेंव्हा नोगाला विचारण्यात आले की तीने त्‍या प्रपोजवर काय उत्‍तर दिले? त्‍यावर तीन म्‍हटले, प्रथम ‘मी हसण्याचे नाटक केले कारण तो माझ्या डोक्‍यात गोळी मारू नये’ नोगाने सुरूवातील शांततेत प्रपोजला रिजेक्‍ट करण्याचा प्रयत्‍न केला होता. मात्र तो ऐकत नसल्‍याचे Hamas लक्षात आल्‍यावर ती त्‍याच्यावर ओरडली.

७ ऑक्‍टोबरला जेंव्हा हमासने Hamas इस्‍त्रायलवर हल्‍ला केला, तेंव्हा नोगाचे वडिल, (५६ वर्षीय) इलान, त्‍यांच्या किबुत्‍ज बेरी भागात सकाळी ७:१५ वाजता आणीबाणीच्या पथकात सामील होण्यासाठी बाहेर पडले, तथापी, ते परत आले नाहीत. हल्ल्यादरम्यान त्‍यांचा मृत्यू झाला आणि त्‍यांचा मृतदेह गाझा येथे नेण्यात आला. जेंव्हा हमासच्या दहशतवाद्यांनी त्‍यांच्या दरवाज्‍यावर गोळीबार सुरू केला तेंव्हा नोगाची आई (वय ५३) ने नोगाला बेडच्या खाली लपायला सांगितले. तेंव्हा हमासचे दहशतवादी घरात घुसले आणि तीला घेवून गेले.

घराला आग लागल्यावर मला निघावे लागले.

नोगा पुढे म्हणाली, जेव्हा त्यांनी आईला बाहेर काढले तेव्हा मला गोळ्यांचा आवाज आला, मला वाटले की तिची हत्या झाली आहे, पण ती जिवंत होती. दहशतवादी घरांना आग लावत असल्याने, लपण्याचा प्रयत्न करूनही नोगाला घरातून बाहेर पडावे लागले. लपण्याचा प्रयत्‍न करूनही शेवटी तिला हमासच्या Hamas दहशतवाद्यांनी बंदी बनवले.

’50 दिवस वेगवेगळ्या घरात ठेवले’

नोगाने सांगितले- ‘जवळपास Hamas 40 दहशतवाद्यांनी मला कलाश्निकोव्हने घेरले होते, त्यांनी माझे हात पाठीमागे बांधले होते. ते मला घेऊन जात होते त्‍यावेळी मी माझ्या ओळखीच्या लोकांचे मृतदेह बघितले. काही मिनिटांनंतर, त्यांनी मला एका कारमध्ये बसवले आणि तेथून निघून गेले. माझ्या बंदिवासात, मला वेगवेगळ्या घरात ठेवले जायचे, जेव्हा मला एका ठिकाणाहून दुसरीकडे हलवले जायचे तेव्हा मला हिजाब घालायला लावले जायचे आणि अपहरणकर्त्यांचे हात धरायला सांगितले जायचे जेणेकरून लोकांना वाटेल की ते विवाहित आहेत.

हेही वाचा : 

Back to top button