नागपूर : कापूस शेतकऱ्यांसाठी ‘एसीआरई’चा उपक्रम; शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न | पुढारी

नागपूर : कापूस शेतकऱ्यांसाठी 'एसीआरई'चा उपक्रम; शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न

वाशीम/नागपूर; पुढारी वृत्तसेवा : भारतात पुनर्निर्माण कापूस शेती पद्धतीला चालना देण्यासाठी सॉलिडारिडाड एशिया, सेंटर फॉर रिस्पॉन्सिबल बिझनेस (सीआरबी) आणि रिजेनॅग्री यांच्या वतीने आज पुनर्निर्माण कृषी (एसीआरई) वर कापूस आणि कापड भागधारकांची युती करण्याची घोषणा केली. यावेळी सीआरबीचे सीईओ रिजित सेनगुप्ता, रिजेनॅग्रीचे सीईओ फ्रँको कॉस्टँटिनी आणि सॉलिडारीडाड आशियाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. शतद्रू चट्टोपाध्याय उपस्थित होते. अलायन्स (एसीआरइ)चा असा अंदाज आहे की, अशा पद्धतीचा अवलंब केल्याने २०३० पर्यंत किमान एक दशलक्ष टन हरितगृह वायू उत्सर्जन (जीएचजी) कमी करण्यात मदत होईल, तसेच भारतातील विविध भागीदारीद्वारे ५ लाखाहून अधिक अल्पभूधारक कापूस शेतकरी आणि त्यांच्या समुदायाचे जीवनमान सुधारेल.

भारताला प्रमाणित पुनरुत्पादक कापसाचा जगातील सर्वात मोठा उत्पादक बनवण्याच्या दृष्टीकोनातून कापसातील पुनरुत्पादक शेतीच्या वाढीस सहाय्य करणे, हा या उपक्रमाचा उद्देश आहे. भारतातील विविध कापूस लँडस्केपमध्ये पुनरुत्पादक शेतीवर कापूस आणि कापड मूल्य शृंखला शेतकऱ्यांमध्ये सहयोग करणे, पुनरुत्पादक कापसाची मागणी करण्यासाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय ग्राहक वापरकर्त्यांमध्ये जागरूकता निर्माण करणे, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर पुनरुत्पादक शेती आणि नैसर्गिक शेतीशी संबंधित धोरणात्मक मुद्द्यांवर चर्चा करणे, कापूस आणि वस्त्रोद्योग क्षेत्रातील खरेदीदार आणि ब्रँड्समध्ये क्षमता आणि कौशल्य निर्माण करणे, कापूस आणि वस्त्रोद्योगांमध्ये पुनरुत्पादक पद्धतींचा व्यापक अवलंब करणे, असे उपक्रम या अलायन्स तर्फे राबविण्यात येणार आहेत. भारतातील आणि प्रामुख्याने कापूस उत्पादक प्रदेशात या उपक्रमाचा शेतकऱ्यांना चांगला फायदा होईल. असा विश्वास नागपुराच्या या सेमिनारमध्ये सर्व अलायन्स घटकांनी व्यक्त केला.

भारत हा कापूस धाग्याचा सर्वात मोठा निर्यातदार देश आहे. औद्योगिक भांडवलात कापसाचा वाटा १६ टक्के आणि औद्योगिक कामगारांचा २० टक्के आहे. सॉलिडारिडाडने विदर्भात भारतातील सर्वात मोठ्या पुनर्निर्मिती प्रमाणपत्र कार्यक्रमांपैकी एक प्रायोगिक तत्त्वावर सुरू केला आहे. ८ हजार लहान शेतकऱ्यांना या पद्धतींचा अवलंब करण्यात मदत केली. सध्या सॉलिडारिडाड या जिल्ह्यातील एक लाखांहून अधिक शेतकर्‍यांसोबत काम करत आहे. यामुळेच सुमारे एक लाख टन जीएचजी कमी होण्यास मदत होईल. प्रगतीशील शेतकऱ्यांचे प्रयत्न ओळखून, सॉलिडारिडाड युरोपचे व्यवस्थापकीय संचालक हेस्के व्हर्बर्ग, यांनी या कार्यक्रमात शेतकऱ्यांचे सत्कार केले.

हेही वाचा :

Back to top button