गोंदिया, पुढारी वृत्तसेवा : निवडणूक कालावधीत विरोधी पक्ष नेते आणि आम्ही एकमेकांच्या विरोधात बोललो होतो. मात्र, आता निवडणूक संपली, आता सगळं संपलं 'बात गयी हो गयाʼ आता विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार भाजप प्रवेश कधी करतील, हे तेच ठरवणार आहेत. त्यांची मर्जी आहे, तेव्हा तारीख तेच ठरवतील, जे व्हायचं ते होणारच आहे, असे सूचक वक्तव्य राज्याचे अन्न व औषध पुरवठा मंत्री तथा गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री धर्मारावबाबा आत्राम यांनी आज (दि.१) केले.