राहुल गांधींना पंतप्रधान व्हावे यासाठी ८६ वर्षीय काँग्रेस कार्यकर्त्याचे गजानन महाराजांना साकडे | पुढारी

राहुल गांधींना पंतप्रधान व्हावे यासाठी ८६ वर्षीय काँग्रेस कार्यकर्त्याचे गजानन महाराजांना साकडे

चंद्रपूर, पुढारी वृत्तसेवा : खा. राहूल गांधी यांची सध्या भारत जोडो यात्रा सुरू आहे. ही यात्रा यशस्वी व्हावी. राहुल गांधी देशाचे पंतप्रधान व्हावेत म्हणून शेगावच्या देवस्थानाला केशव आवारी अक्षर सुधारक यांनी मनीऑर्डर केली. यातून राहुल यांचे नावाने अभिषेक करावा, अशी विनंती त्‍यांनी केली आहे. दरम्‍यान, देवस्थानकडून याची दखल घेत दुपट्टा व प्रसाद दिला. हा दुपट्टा आणि प्रसाद भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधी यांना शेगाव मुक्कामी भेट घेऊन देण्याचा मानस आहे, असे ते म्‍हणाले. ८६ वर्षीय केशव आवारी अक्षर सुधारक म्हणूनही ओळखले जातात. त्यांनी चालवलेल्या वर्गातून आजवर अनेकांची अक्षरे सुधारली आहेत.

नेहरू – गांधी घराण्यावर असलेले प्रेम, काँग्रेस पक्षासोबत असलेली निष्ठा यातूनच यशवंतराव चव्हाण, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचेशी चंद्रपूर येथील केशवराव आवारी यांनी आजवर अनेकदा पत्रव्यवहार केला आहे. इंदिरा गांधी, राजीव गांधी सार्वत्रिक निवडणुकीत मिळविलेले यशाबद्दल त्‍यांनी अभिनंदन केले होते.  इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर राजीव गांधी यांचे सांत्वन करण्यासाठी त्‍यांनी  पत्र लिहीले होते. भेटीची वेळ मागितली पण आजवर कधी योग जुळुन आला नाही. राजीव गांधी यांचे पश्चात सोनिया गांधीकडे काँग्रेसची धुरा आली.

केशवराव आवारी हे गजानन महाराजांचे भक्त असल्याने अनेक वर्षांपासून ते शेगाव येथे दर्शनाला जातात. राहूल गांधी यांना पंतप्रधान म्हणून बघण्याची त्यांची इच्छा आहे. त्‍यामूळे ते राहुल गांधींच्या नावाने तेथे अभिषेक करतात. गेल्‍या 5 वर्षांपासून पोलिओमुळे एका पायाने अपंग आणि एका अपघातामुळे पायाने आवारी यांना चालता येत नाही. त्‍यामूळे ते ५ वर्षांपासून शेगाव देवस्‍थानला मनी ऑर्डरने पैसे पाठवून अभिषेक करून घेतात. सध्या सुरू असलेली भारत जोडो यात्रा यशस्वी व्हावी व राहुल गांधी लवकरच देशाचे पंतप्रधान व्हावेत म्हणून त्यांनी नुकताच शेगावच्या देवस्थानाला मनी ऑर्डर करून राहुल यांचे नावाने अभिषेक करण्याची विनंती केली आहे.

हेही वाचा  

G20 शिखर परिषदेत पंतप्रधान मोदी पहिल्यांदाच ब्रिटनचे पीएम ऋषी सुनक यांना भेटले

खड्ड्यांमुळे भूगावला वाहतूक कोंडी; खड्डे बुजविले नाही तर ग्रामस्थ करणार रास्ता रोको

Reserve Bank of India : रिझर्व्ह बँकेने देशातील ९ सहकारी बँकांना ठोठावला दंड

Back to top button