Reserve Bank of India : रिझर्व्ह बँकेने देशातील ९ सहकारी बँकांना ठोठावला दंड

Reserve Bank of India : रिझर्व्ह बँकेने देशातील ९ सहकारी बँकांना ठोठावला दंड

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : भारतीय रिझर्व्ह बँकेकडून (Reserve Bank of India) देशातील सर्व सार्वजनिक, खासगी आणि सहकारी क्षेत्रातील बँकांचे नियमन केले जाते. आणि नियम ठरवते. या नियमांचे उल्लंघन झाल्यास कारवाई देखील केली जाते. आरबीआयने विविध बँकिंग नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल ९ सहकारी बँकांना सुमारे १२ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे, अशी माहिती रिझर्व्ह बँकेने प्रसिद्ध पत्रकातून दिली आहे.

नियामक अनुपालनातील त्रुटींमुळे ही कारवाई करण्यात आल्याचे रिझर्व्ह बँकेने (Reserve Bank of India) म्हटले आहे. या कृतीचा उद्देश या बँकांनी त्यांच्या ग्राहकांसोबत केलेल्या कोणत्याही व्यवहाराच्या किंवा कराराच्या वैधतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणे नाही. रिझव्‍‌र्ह बँकेकडून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बँकांविरुद्ध यापूर्वीही अशीच पावले उचलण्यात आली आहेत.

Reserve Bank of India : कोणत्या बँकांचा सहभाग आहे ?

नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल बेरहामपूर को-ऑपरेटिव्ह अर्बन बँक (ओडिशा) 3.10 लाख रुपये, उस्मानाबाद जनता सहकारी बँकेवर 2.5 लाख रुपये आणि संतरामपूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडवर 2.5 लाख रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.
त्याचबरोबर जिल्हा सहकारी सेंट्रल बँक मरियडित, बालाघाट (मध्य प्रदेश), जमशेदपूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक जमशेदपूर (झारखंड) आणि रेणुका नागरी सहकारी बँक मरियडित, अंबिकापूर (छत्तीसगड) या बँकांना रिझर्व्ह बँकेने प्रत्येकी एक लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.

ओडिशा आणि गुजरातच्या या बँकांवरही कारवाई

कृष्णा मर्कंटाइल को-ऑपरेटिव्ह बँक, मध्य प्रदेश आणि केंद्रपारा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक, ओडिशा या बँकांना 50 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. दुसरीकडे, नवानगर को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, गुजरात या बँकेला 25 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

रिझर्व्ह बँकेने यापूर्वीही अशी पावले उचलली होती

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया देशातील सर्व बँकांसाठी नियम बनवते. रिझर्व्ह बँक बँकांच्या आर्थिक स्थितीवर लक्ष ठेवते आणि ते नियमांचे पालन करत आहे की नाही याचीही काळजी घेते. कोणतीही बँक नियमांचे उल्लंघन करताना आढळून आल्यास संबंधित बँकेवर कारवाई केली जाते. नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल रिझर्व्ह बँकेकडून बँकांना मोठा दंड ठोठावला जातो. त्याचबरोबर एखाद्या बँकेची आर्थिक स्थिती चांगली नसल्यास तिचा परवानाही रद्द केला जाऊ शकतो.

हेही वाचलंत का ? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news