नाशिक बस अपघातात बुलढाणा जिल्ह्यातील आजीनातीचा मृत्यू | पुढारी

नाशिक बस अपघातात बुलढाणा जिल्ह्यातील आजीनातीचा मृत्यू

बुलढाणा, पुढारी वृत्तसेवा: नाशिकजवळील नांदूर नाक्याजवळ आज (दि.८) पहाटे ट्रेलर व खासगी बसच्या जोरदार धडकेत बस जळून १२ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील बिबी गावातील आजी व तीन वर्षांची नात अशा दोघींचा मृत्यू झाला. लक्ष्मीबाई नागोराव मुधोळकर (वय ५०) व नात कल्याणी आकाश मुधोळकर (वय ३) अशी मृत आजी व नातीचे नाव आहे. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, शुक्रवारी रात्री ११.३० वाजता बिबी गावातून त्या दोघी खासगी बसमध्ये बसल्या होत्या. ही बस यवतमाळ येथून मुंबईकडे चालली होती. प्रवासादरम्यान पहाटे ५.१५ च्या सुमारास नाशिकजवळ एक ट्रेलर व या खासगी बसचा भीषण अपघात झाला. यात बसला आग लागल्याने बसमधील १२ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. तर अन्य ३८ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. या बसमध्ये बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथे बसलेले रेहान पठाण, भागवत भिसे, विशाल पतंगे हे तीन प्रवासी सुदैवाने बचावले आहेत.

हेही वाचलंत का ? 

Back to top button