इस्लामच्या वाटेवर चालण्यासाठी आणखी एका अभिनेत्रीचा अभिनयाला रामराम | पुढारी

इस्लामच्या वाटेवर चालण्यासाठी आणखी एका अभिनेत्रीचा अभिनयाला रामराम

पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनयाच्या तारांगणात अनेक तारे येत असतात आणि जात असतात. काही कलाकार काम आणि अदाकारीने आपली खास ओळख बनवतात. तर काही वेगळ्याच कारणाने चर्चेत राहताना दिसतात. आताही एक अभिनेत्री चर्चेत आहे. पण ही अभिनेत्री चर्चेत असण्याचं कारण मात्र खूपच वेगळं आहे.

ही अभिनेत्री तिच्या अभिनय किंवा सिनेमामुळे नाही तर अभिनयाला राम राम करण्यामुळे चर्चेत आहे. भोजपुरी अभिनेत्री सहर अफशा हिने अत्यंत कमी वयात बॉलीवूड करियरला राम राम ठोकला आहे. याला कारण देताना तिने एक लंबी चौडी पोस्टही लिहली आहे. आपल्या पोस्टमध्ये ती म्हणते, मी माझ्या चाहत्यांशी शेयर करू इच्छिते की मी आजपासून मनोरंजन क्षेत्रापासून फारकत घेत आहे. यापुढे इस्लाम आणि अल्लाहची सेवा हेच माझ्या जीवनाचं ध्येय असेल. मी माझ्या अल्लाहकडे केलेल्या चुकांबद्दल क्षमा मागते, माझ्या नवीन प्रवासासाठी तुमच्या सदिच्छा माझ्यासाठी मोलाच्या आहेत.

हिंदी, इंग्रजी आणि उर्दू भाषेतून ही पोस्ट शेयर केली आहे. अशा प्रकारे धर्मासाठी अभिनयातील करियरला रामराम ठोकणारी ही काही पहिली अभिनेत्री नाहीये. दंगलमधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली जायरा वासीम हिनेही सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत अभिनय क्षेत्रापासून फारकत घेत असल्याचे शेअर केले होते . तर बिग बॉस या रिअलिटी शोमधून आणि जय हो या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या सना खाननेही अभिनयापासून फारकत घेतली होती. सनाने यानंतर एक मौलवीशी लग्न केलं होतं.

Back to top button