Iran Protest : इराण आंदोलनात १७ वर्षांच्या अल्पवयीन मुलीचा मृत्यू; कुटुंबियांकडून खूनाचा आरोप | पुढारी

Iran Protest : इराण आंदोलनात १७ वर्षांच्या अल्पवयीन मुलीचा मृत्यू; कुटुंबियांकडून खूनाचा आरोप

पुढारी ऑनलाईन डेस्क : इराणमध्ये हिजाब विरोधात सुरु असलेले आंदोलन (Iran Protest) दिवसेंदिवस तीव्र होत चालले आहे. फक्त इराणमध्येच नाहीत तर संपूर्ण जगात याचे पडसाद उमटत आहेत. या आंदोलना २२ वर्षांच्या महसा अमिनी हिच्या मृत्यू नंतर हे आंदोलन तीव्र झाले होते. आता या आंदोलनात आणखी एका अल्पवयीन मुलीचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे हिजाब विरोधी सुरु असलेले आंदोलन आणखी भडकण्याची चिन्हे वर्तवली जात आहेत. दरम्यान १७ वर्षांच्या निका शकरामी (Nika Shakarami) या मुलीचा मृत्यू इमारतीवरुन पडून झाल्याचा दावा तेथील अधिकाऱ्यांनी केला आहे. तर निकाच्या कुटुंबियांनी तिचा खून करण्यात आल्याचा आरोप केला आहे.

हिजाब विरोधी आंदोलनाने (Iran Protest) आता संपूर्ण इराण घेरले आहे. सामन्या स्त्रिया, नागरिक सुद्धा या हिजाब विरोधी आंदोलनात सहभागी होत आहे. दिवसेंदिवस हे आंदोलन तीव्र होत आहे. तर हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न इराणच्या सरकारकडून केला जात आहे. यामध्ये दिवसेंदिवस इराणाचे पोलिस आणि नागरिकांमध्ये धुमश्चक्री उडत आहे. २२ वर्षांच्या महसा अमिनी या युवतीची कोठडीत हत्या करण्यात आल्यानंतर या प्रदर्शनात मोकळे सोडलेल्या केसांना बाधणाऱ्या मुलीचा फोटो वायरल झाला होता. यानतंर या मुलीची गोळी घालून हत्या करण्यात आली होती. त्या मुलीचे नाव हदीस नजफी होते आणि ती इराण मधील टिकटॉक आणि इंस्टाग्राम स्टार होती. आता या मालिकेत निका शकरामी या १७ वर्षाच्या अल्पवयीन मुलीचा समावेश झाला आहे. पहिल्यांदा तिचे नाक फोडण्यात आले आणि नंतर तिचे डोके चिरडून तिची हत्या करण्यात आल्याचा आरोप तिच्या कुटुंबियांनी केला आहे.

माहितीनुसार, आंदोलनानंतर (Iran Protest) निका गायब झाली. तिच्या कुटुंबियांनी तिचा सर्वत्र शोध घेतला पण, ती सापडली नाही. डिटेंशन सेंटर पासून ते सर्व पोलिस ठाण्यांमध्ये तिचा शोध घेण्यात आला. यानंतर २९ सप्टेंबर रोजी पोलिसांनी तिच्या कुटुंबियांना माहिती दिली की निकाचा मृतदेह आढळला आहे. निकाची आई नसरीन शिकरामी यांनी आरोप केला की पहिल्यांदा पोलिसांनी तिचा मृत्यू झाल्याचे नऊ दिवसांपासून लपवले आणि त्यानंतर आमच्या इच्छे विरोधात तिला दूर एका ठिकाणी दफन करण्यात आले.

मात्र या सर्व गोष्टींनंतरही जगभरात इराणी महिलांच्या हक्कांसाठी निदर्शने वाढत आहेत. हिजाब जाळणाऱ्या आणि केस कापणाऱ्या महिलांची छायाचित्रे जगभरात सोशल मीडियावर गाजत आहेत. अनेक ठिकाणी पुरुषांनीही या निदर्शनांमध्ये भाग घेतला आणि इटलीच्या बेला चाओ या प्रोटेस्ट गाण्याचे पर्शियन व्हर्जन गाऊन सरकारचा निषेध केला जात आहे.

Back to top button