ठाणे : कल्याणात झाड कोसळून रिक्षाचे मोठे नुकसान | पुढारी

ठाणे : कल्याणात झाड कोसळून रिक्षाचे मोठे नुकसान

डोंबिवली, पुढारी वृत्तसेवा : कल्याण पश्चिमेला एका रिक्षावर भले मोठे झाड कोसळून रिक्षाचे मोठे नुकसान झाले. मात्र सुदैवाने या रिक्षाचा चालक गाडीत नसल्याने त्याचा जीव वाचला. कल्याण पश्चिमेच्या मोहिंदर सिंग शाळेबाहेरील रस्त्यावर हा प्रकार घडला. गेल्या २-३ दिवसांपासून कल्याण डोंबिवलीत मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे काही ठिकाणी झाड उन्मळून पडण्याच्या घटना घडत आहेत.

आजही पाऊस जोरदार पडत असताना कल्याण पश्चिमेच्या मोहिंदर सिंग रोडवर भले मोठे झाड कोसळून रिक्षावर पडले आणि त्या रिक्षाचे मोठे नुकसान झाले. दरम्यान सुदैवाने या रिक्षाचा चालक काही कामानिमित्त रिक्षातून त्याचवेळी बाहेर पडल्यामुळे तो बचावला. परंतु, या घटनेमध्ये रिक्षाचे मोठे नुकसान झाले आहे.

हेही वाचलंत का?

Back to top button