चॉकलेटच्या आमिषाने मुलीवर अत्याचार; वृद्धास कारावास | पुढारी

चॉकलेटच्या आमिषाने मुलीवर अत्याचार; वृद्धास कारावास

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : चॉकलेटच्या आमिषाने घरात बोलावून सहा वर्षांच्या मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी मनोहर श्रीमंत सुतार (वय 66) यास प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती कविता बी. अग्रवाल यांनी दोषी ठरवून पाच वर्षे कारावास व एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. करवीर तालुक्यात 2 नोव्हेंबर 2019 मध्ये ही घटना घडली होती.

खटल्यात सरकारी पक्षाच्या वतीने सरकारी अभियोक्ता अ‍ॅड. ए. एम. पिरजादे यांनी काम पाहिले. पीडित मुलगी घरासमोर खेळत असताना चॉकलेट देण्याचे आमिष दाखवून आरोपीने तिला घरात बोलावले. घराचा दरवाजा बंद करून घेऊन नराधमाने मुलीवर अत्याचार केला होता. याप्रकरणी करवीर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.

खटल्याच्या सुनावणीत 12 साक्षीदार तपासण्यात आले. साक्षीदारांची साक्ष तसेच सरकारी अभियोक्ता अ‍ॅड. पिरजादे यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायाधीशांनी आरोपीला दोषी ठरवून शिक्षा सुनावली.

Back to top button