काळजी घ्या! शहरातील उकाड्यात वाढ; कोरेगाव पार्क, चिंचवड 41 अंशांवर | पुढारी

काळजी घ्या! शहरातील उकाड्यात वाढ; कोरेगाव पार्क, चिंचवड 41 अंशांवर

पुणे : पुढारी वृत्तसेवा : शहरात गेले दोन दिवस पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला होता. मात्र, पाऊस न पडल्याने दिवसभर ढगाळ वातावरण होते. त्यामुळे उकाड्यात वाढ झाली. दरम्यान, कोरेगाव पार्क अणि चिंचवडचे तापमान 41 अंशांवर गेले. शनिवारी 19 एप्रिल रोजी शहरात चांगला पाऊस झाला. त्यामुळे किमान व कमाल तापमानात थोडी घट झाली होती. त्यानंतर शहरात पावसाचा अंदाज देण्यात आला. मात्र, पावसाने हुलकावणी दिली. तापमानातील वाढ आणि ढगाळ वातावरणामुळे शहरात गुरुवारी कमालीचा उकाडा होता. शहरातील कोरेगाव पार्क, चिंचवड भागाचे तापमान 41, तर शिवाजीनगरचा पारा 39 अंशांवर पोहोचला.

शहराचे गुरुवारचे कमाल-किमान तापमान

शिवाजीनगर 39 (22.9), पाषाण 39(22.9), लोहगाव 39(25.7), चिंचवड 41(27), लवळे 39(26), मगरपट्टा 40(27.9), एनडीए 39(22.3), कोरेगाव पार्क 41(26.6)

हेही वाचा

Back to top button