कोयना परिसरात ३.९ रिश्टर स्केलचा भूकंप - पुढारी

कोयना परिसरात ३.९ रिश्टर स्केलचा भूकंप

पाटण; पुढारी वृत्तसेवा

कोयनेसह सातारा व रत्नागिरी जिल्ह्यातील काही विभागात जाणवलेला ३.९ रिश्टर स्केलचा भूकंप रविवारी संध्याकाळी पाच वाजून सात मिनिटांनी झाल्याची माहिती कोयना धरण व्यवस्थापनाकडून देण्यात आली .

 रविवारी संध्याकाळी पाच वाजून सात मिनिटांनी झालेल्या ३.९  रिश्टर स्केलच्या भूकंपाचा केंद्रबिंदू वारणा खोऱ्यात तनाली गावाच्या पश्चिमेला बारा किलोमीटर अंतरावर असल्याचे सांगण्यात आले. कोयना धरणापासून केंद्रबिंदूचे अंतर २८ किलोमीटर आहे.

Amit Shah in Jammu Kashmir : जम्‍मू-काश्‍मीरमध्‍ये यापुढे तीन कुटुंबांची दादागिरी चालणार नाही

भूकंपाची खोली १५ किलोमीटर अंतरावर असल्याचे सांगण्यात आले . हा भूकंप कोयना, पाटण, कराड, चिपळूण, पोफळी आदी सातारा व रत्नागिरी जिल्ह्यातील काही विभागात जाणवला. या भूकंपामध्ये कोणतीही वित्तहानी झाली नसून कोयना धरण पूर्णपणे सुरक्षित असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे .

चांदोली परिसराला भूकंपाचा धक्का

चांदोली परिसर आज रविवारी भूकंपाच्या धक्क्यांने हादरला.5 वाजून 07 मिनिटांच्या सुमारास चांदोली परिसराला भूकंपाचा धक्का बसला. वारणावती येथील भूकंपमापन केंद्रावर त्याची तीव्रता 2.9 रिश्‍टर इतकी नोंदली गेली.

हा धक्का अति सौम्य स्वरूपात असला तरी परिसरात जोरात शिवाय अधिक वेळ जाणवला. या भूकंपाची नोंद अस्पष्टपणे झाल्यामुळे या भूकंपाचा केंद्रबिंदू कोठे आहॆ हे समजू शकले नाही. या धक्क्यामुळे कोणतीही जीवित वा वित्तहानी झाली नसून धरण सुरक्षित असल्याचा निर्वाळा धरण प्रशासनाने दिला आहे.

हेही वाचलत का?

Back to top button