China vs India : चीनची नवी चाल; भारत सीमावाद असताना केला नवा कायदा - पुढारी

China vs India : चीनची नवी चाल; भारत सीमावाद असताना केला नवा कायदा

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारताच्या सीमारेषेवर (एलएसी) वाढत चाललेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर चीन (China vs India) नवी चाल खेळली आहे. चीनच्या पिपुल्स काॅंग्रेसच्या स्थायी सदस्यांकडून नवीन भूमी सीमा कायदा पास करण्यात आला आहे. या कायद्यांतर्गंत चीन सीमावर्ती भागात आपली ताकद वाढविण्याचा प्रयत्न करत आहे. इतकंच नाही तर त्या भागांमध्ये सामान्य नागरिकांच्या राहण्याची सोय करत आहे. कारण, असं केल्यामुळे कोणत्याही देशाला या भागात कारवाई करताना अडचणी येतील.

चीनचा कायदा काय म्हणतो? 

चीन या कायद्याला सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अंखडतेच्या दृष्टीने अंहिसक सांगत आहे. त्या अंतर्गत सीमावर्ती भागात सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे. या भागात आर्थिक, सामाजिक विकास आणि सार्वजनिक क्षेत्र आणि इन्फ्रास्ट्रक्चरदेखील विकसित करण्याचा प्रयत्न करणार आहे, सीमावर्ती भागात लोकांना राहण्याच्या आणि काम करण्याच्या दृष्टीने सुरक्षा आणि आर्थिक, सामाजिक समन्वय राखण्याचा केला जाईल. या कायदा पुढील वर्षी जानेवारी महिन्यापासून लागू होणार आहे. ॉ

भारत-चीन वादात पडणार आणखी भर

भारत आणि चीन दिर्घकालापासून सीमावाद (China vs India) आहे. दोन्ही देशांमध्ये सीमा रेषेवर (एलएसी) झालेल्या समझोत्याला अंतिम रुप देणं बाकी आहे. दरम्यान, चीन आणि भारत यांच्यामध्ये तणावाचं वातावरण असतं. लडाख सेक्टरमध्ये कित्येक वेळ दोन्ही देश आमने-सामने आले आहेत. त्यामध्ये हिंसादेखील झाली आहे. अशा पार्श्वभूमीवर चीनकडून करण्यात आलेल्या कायद्याचा समझोत्यावर परिणाम होऊन नवे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

भारत आणि भूतानपासून आहे सीमा वाद

चीनचा सीमावाद हा भारत आणि भूतान यावरून जास्त आहे. दोन्ही देशांमध्ये यावरून समझोता झालेला आहे. फक्त त्याला अंतिम रुप देणं बाकी आहे. भारत-चीन यांच्यामध्ये एलएसीवर असणाऱ्या ३४८८ किलोमीटरला घेऊन वाद आहे. तर भूतानसोबत ४०० किलोमीटरचा वाद आहे. चीनने जवळ जवळ १२ देशांसोबत असणाऱा सीमावाद संपवून टाकला आहे.

हेही वाचलंत का?

Back to top button