चांदोली परिसराला भूकंपाचा धक्का - पुढारी

चांदोली परिसराला भूकंपाचा धक्का

वारणावती; पुढारी वृत्तसेवा

चांदोली परिसर आज रविवारी भूकंपाच्या धक्क्यांने हादरला.5 वाजून 07 मिनिटांच्या सुमारास चांदोली परिसराला भूकंपाचा धक्का बसला. वारणावती येथील भूकंपमापन केंद्रावर त्याची तीव्रता 2.9 रिश्‍टर इतकी नोंदली गेली.

हा धक्का अति सौम्य स्वरूपात असला तरी परिसरात जोरात शिवाय अधिक वेळ जाणवला. या भूकंपाची नोंद अस्पष्टपणे झाल्यामुळे या भूकंपाचा केंद्रबिंदू कोठे आहॆ हे समजू शकले नाही.

या धक्क्यामुळे कोणतीही जीवित वा वित्तहानी झाली नसून धरण सुरक्षित असल्याचा निर्वाळा धरण प्रशासनाने दिला आहे.

हेही वाचलत का?

Back to top button