INDvPAK : पाकिस्तानचा भारतावर १० विकेट राखून ऐतिहासिक विजय! - पुढारी

INDvPAK : पाकिस्तानचा भारतावर १० विकेट राखून ऐतिहासिक विजय!

दुबई : पुढारी ऑनलाईन

कोहलीच्या नेतृत्वाखालील विराट सेना आणि बाबर आझमची फौज दुबईच्या आंतरराष्ट्रीय मैदानात झुंजत आहे. जगातील कोट्यवधी डोळे या सामन्याकडे रोखले आहेत. टी २० वर्ल्डकपच्या इतिहासात भारताने पाकला 5 वेळा पाणी पाजले आहे. आज विराट सेना ६ व्यांदा असा पराक्रम करण्यास सज्ज आहे. दरम्यान पाकिस्तानने टॉस जिंकून पहिला गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. टीम इंडियाने पहिला फलंदाजी करत ७ बाद १५१ धावा केल्या. पाक समोर विजयासाठी १५२ धावांचे आव्हान ठेवले.

India vs Pakistan Cricket Score T20 World Cup 2021 : Pakistan LIVE Batting Score

पाकिस्तानचा भारतावर १० विकेट आणि १३ चेंडू राखून ऐतिहासिक विजय

१८ व्या षटकाच्या ५ व्या चेंडूवर दोन धावा काढून १५२ धावा पूर्ण केल्या. याचबरोबर पाकचा भारतावर विजय

१८ व्या षटकाच्या दुस-या आणि तिस-या चेंडूवर चौकार

१८ व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर रिझवानचा शमीला षटकार

१७ व्या षटकाअखेर पाकिस्तानची धावसंख्या बिनबाद १३५

१६ व्या षटकाअखेर पाकिस्तानची धावसंख्या बिनबाद १२८

१६ व्या षटकाच्या दुस-या चेंडूवर रिझवानकडून शमीच्या गोलंदाजीवर चौकार

१५ व्या षटकाअखेर पाकिस्तानची धावसंख्या बिनबाद १२१

१५ व्या षटकाच्या २ -या चेंडूवर चौकार लगावून रिझवानचे अर्धशतक पूर्ण

१४ व्या षटकाअखेर पाकिस्तानची धावसंख्या बिनबाद ११२

१४ व्या षटकात ११ धावा वसूल

१४ व्या षटकात जडेजाला दोन चौकार

१३ व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर बाबर आझमचा चक्रवर्तीला षटकार, बाबरचे अर्धशतक

१३ व्या षटकाच्या २ -या चेंडूवर रिझवानचा चक्रवर्तीला षटकार

१२ व्या षटकाअखेर पाकिस्तानची धावसंख्या बिनबाद ८५

११ व्या षटकाअखेर पाकिस्तानची धावसंख्या बिनबाद ८०

पाकच्या सलामी जोडीने भारताच्या गोलंदाजांचा काढला फेस

१० व्या षटकाअखेर पाकिस्तानची धावसंख्या बिनबाद ७१

१० व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर वरुण चक्रवर्तीला बाबर आझमकडून चौकार

९ व्या षटकाअखेर पाकिस्तानची धावसंख्या बिनबाद ६२

९ व्या षटकात १० धावा वसूल

९ व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर जडेजाला बाबरने लगावला षटकार

आठव्या षटकाअखेर पाकिस्तानची धावसंख्या बिनबाद ५२

सातव्या षटकाअखेर पाकिस्तानची धावसंख्या बिनबाद ४६

सहाव्या षटकाअखेर पाकिस्तानची धावसंख्या बिनबाद ४३

पाचव्या षटकाअखेर पाकिस्तानची धावसंख्या बिनबाद ३५

पाचव्या षटकात ११ धावा वसूल, मोहम्मद शमीला दोन चौकार

वरुण चक्रवर्तीची टीच्चून गोलंदाजी, चौथ्या षटकात पाकिस्तानला केवळ २ धावा मिळाल्या

तिस-या षटकाअखेर PAK ची धावसंख्या बिनबाद २२

दुस-या षटकाअखेर PAK ची धावसंख्या बिनबाद १८

पहिल्या षटकाअखेर PAK ची धावसंख्या बिनबाद १०

पहिल्या षटकात रिझवानने भुवनेश्वर कुमारला दुस-या चेंडूवर चौकार, आणि तिस-या चेंडूवर षटकार लगावला

पाकिस्तानचे सलामीवीर बाबार आझम आणि मोहम्मद रिझवान मैदानात

India Batting Score

शाहीन आफ्रिदीने पहिल्याच षटकात रोहित शर्माला शुन्यावर बाद करून पाकिस्तानला शानदार सुरुवात करून दिली. आफ्रिदीने पुढच्याच षटकात केएल राहुल (३) ला बाद करत भारताला जोरदार झटका दिला. तिसऱ्या विकेटसाठी कोहली आणि सूर्यकुमार यादव यांनी २१ चेंडूत २५ धावा जोडून डाव सांभाळला. दरम्यान, हसन अलीने सूर्याला (११) बाद करून भारताला आणखी एक धक्का दिला. त्यानंतर ऋषभ पंत आणि विराट कोहली यांनी चौथ्या विकेटसाठी ४० चेंडूत ५३ धावांची भागीदारी केली. शानदार फलंदाजी करणाऱ्या पंतला (३९) पॅव्हेलियनमध्ये पाठवण्याचे काम शादाब खानने केले. कर्णधार कोहलीने ५७ धावांची शानदार खेळी खेळली. त्याला शाहिन आफ्रिदीने बाद केले. रवींद्र जडेजा (१३) आणि हार्दिक पांड्या (११) यांनी धावा केल्या. भुवनेश्वर कुमारने नाबाद ५ धावा केल्या. शमी शुन्यावर नाबाद राहिला. याचबरोबर भारताने ७ बाद १५१ धावांपर्यंत मजल मारली आणि पाकिस्तानला विजयासाठी १५२ धावांचे आव्हान दिले.

शेवटच्या ५ षटकांमध्ये भारताने ५१ धावा वसूल केल्या

पाकिस्तानला विजयासाठी १५२ धावांची गरज

२० व्या षटकाअखेर भारताची धावसंख्या ७ बाद १५१

२० व्या षटकाच्या ३ -या चेंडूवर हार्दिक पंड्या बाद

१९ व्या षटकाअखेर भारताची धावसंख्या ६ बाद १४४

१९ व्या षटकाचा शेवटचा चेंडू नो बॉल घोषीत, त्या चेंडूवर हार्दिकने चौकार लगावला, त्यानंतरच्या चेंडूवर १ धाव काढताना बाय चौकार मिळाला.

१९ व्या षटकाचा शेवटचा चेंडू नो बॉल घोषीत, त्या चेंडूवर हार्दिकने चौकार लगावला, त्यानंतरच्या चेंडूवर १ धाव काढताना बाय चौकार मिळाला.

१९ व्या षटकाच्या दुस-या चेंडूवर हार्दिक पंड्याने शाहिन आफ्रिदीला चौकार लगावला

१८ व्या षटकाअखेर भारत ५ बाद १२५ धावा

१८ व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर रविंद्र जडेजा बाद, हसन अलीला त्याला बाद केले.

१८ व्या षटकाच्या चौथ्या -या चेंडूवर जडेजाने हसन अलीला चौकार लगावला

१८ व्या षटकाच्या दुस-या चेंडूवर कोहलीने हसन अलीला चौकार लगावला

१८ व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर दोन धावा काढून विराट कोहलीने पूर्ण केले अर्धशतक

१७ व्या षटकाअखेर भारताची धावसंख्या ४ बाद ११४

१६ व्या षटकाच्या दुस-या आणि चौथ्या चेंडूवर विराट कोहलीने हसन अलीला चौकार लगावले

१५ व्या षटकाअखेर भारताची धावसंख्या ४ बाद १००

१५ व्या षटकात भारताचे शतक

१४ व्या षटकात ९ धावा वसूल

१४ व्या षटकाअखेर भारताची धावसंख्या ४ बाद ९६

१४ व्या षटकाच्या ५ व्या चेंडूवर विराटने रौफला चौकार लगावला

१३ व्या षटकाअखेर भारताची धावसंख्या ४ बाद ८७

पंत बाद झाल्यानंतर रविंद्र जडेजा मैदानात उतरला आहे.

भारताचा चौथा झटका, १३ व्या षटकाच्या तिस-या चेंडूवर ऋषभ पंत (३० चेंडूत ३९ धावा) बाद, शाबाद खानने त्याला माघारी धाडले

१३ व्या षटकात पंत-कोहली जोडीची आश्वाशक ५० धावांची भागिदारी

१२ व्या षटकात पंत-कोहली जोडीने वसूल केल्या १५ धावा

१२ व्या षटकाअखेर भारताची धावसंख्या ३ बाद ८१

१२ व्या षटकाच्या पहिल्या आणि दुस-या चेंडूवर ऋषभ पंतने हसन अलीला षटकार ठोकले

११ व्या षटकाअखेर भारताची धावसंख्या ३ बाद ६६

१० व्या षटकाअखेर भारताची धावसंख्या ३ बाद ६०

९ व्या षटकाअखेर भारताची धावसंख्या ३ बाद ५२

९ व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर ऋषभ पंतने शाबाद खानला लगावला चौकार

आठव्या षटकाअखेर भारताची धावसंख्या ३ बाद ४३

सातव्या षटकाअखेर भारताची धावसंख्या ३ बाद ३९

सातव्या षटकाअखेर भारताची धावसंख्या ३ बाद ३६

सहाव्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर सुर्यकुमार यादव (८ चेंडूत ११ धावा) माघारी, हसन अलीने त्याला बाद केले.

५ व्या षटकाअखेर भारताची धावसंख्या २ बाद ३०

५ व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर विराट कोहलीने शाहिन आफ्रिदीच्या गोलंदाजीवर ठोकला षटकार

४ थे षटक भारत २ बाद २१ धावा, इमादच्या चेंडूवर सुर्यकुमारचा चौकार

३ रे षटक भारत २ बाद १४ धावा, शेवटच्या चेंडूवर सुर्यकुमार यादवचा शाहिन आफ्रिदीला ठोकला षटकार

शाहीन आफ्रिदीने भारताला आणखी एक झटका दिला. त्याने तिस-या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर के एल राहुलला (८ चेंडूत ३ धावा) क्लिन बोल्ड केले.

२ रे षटक भारत १ बाद ६ धावा

रोहित शर्मा बाद झाल्यानंतर विराट कोहलीने राहुलला सह संयमी खेळ सुरू केला आहे.

पाकिस्तानच्या शाहिन आफ्रिदीची टीच्चून गोलंदाजी, भारत पहिल्या षटकात १ बाद २ धावा

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली मैदानात उतरला

वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीने सामन्याच्या पहिल्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर भारताला मोठा धक्का दिला. रोहित शर्माला एलबीडब्ल्यू आऊट करून शाहीनने पाकिस्तानला यश मिळवून दिले. रोहितला खातेही उघडता आले नाही. तो शुन्यावर बाद झाला.

राहुलने भारतासाठी पहिली धाव काढली, तिस-या चेंडूवर धाव काढन्यात यश मिळाले

सामन्याचा पहिला चेंडू शाहीन आफ्रिदीने फेकला, के एल राहुलने त्याचा सामना केला

सलामीवीर रोहित शर्मा आणि के एल राहुल मैदानात उतरले

टी २० विश्वचषक स्पर्धेतील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हाय व्होल्टेज सामना आज दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर रंगणाला आहे. भारतीय संघाने आतापर्यंत विश्वचषकातील पाचही सामन्यांमध्ये पाकिस्तानचा पराभव केला आहे. क्रिकेटचा हा ब्लॉकबस्टर सामना आयसीसी स्पर्धेतील जगाचे लक्ष वेधून घेणारा सामना असतो. टी 20 फॉरमॅटमध्ये पूर्ण 2045 दिवसांनी पुन्हा एकदा, म्हणजे 5 वर्षे, 7 महिने आणि 5 दिवसांनी पारंपरिक प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत.

भारत इलेव्हन :

केएल राहुल, रोहित शर्मा, विराट कोहली, सुर्यकुमार यादव, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, व्ही चक्रवर्ती, मोहम्मद शमी, जसप्रित बुमराह

Image

पाकिस्तान इलेव्हन :

बाबर आझम, मोहम्मद रिझवान, एफ जमान, एम हाफिज, एस मलिक, ए अली, एस खान, मी वसीम, एच अली, एच रौफ, एस आफ्रिदी

Back to top button