सातारा : ग्रामपंचायतीचा गुलाल कुणाचा?; ग्रामपंचायत निवडणुकीसाठी गावगाडा सज्ज | पुढारी

सातारा : ग्रामपंचायतीचा गुलाल कुणाचा?; ग्रामपंचायत निवडणुकीसाठी गावगाडा सज्ज

कोरेगाव : पुढारी वृत्तसेवा : सातारा जिल्ह्यातील ३१९ ग्रामपंचायतीची रणधुमाळी सुरू झाली आहे. यात कोरेगाव तालुक्यातील ५१ ग्रामपंचायतीपैकी ४३ ग्रामपंचायतीसाठी काटे की टक्कर होणार आहे. यामध्ये ७ ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या असून, आता सरपंच पदासाठी ४१ आणि सदस्य पदासाठी २८७ ठिकाणी प्रत्यक्ष निवडणूक लागली आहे. यासोबत ८ सरपंच आणि १२२ सदस्य उमेदवार बिनविरोध निवडून आले.

एकूण ६० हजार ५३३ मतदार मतदानाचा अधिकार बजावणार आहेत. त्यापैकी २९ हजार ४९० महिला मतदार आणि ३१ हजार ४३ पुरुष मतदार मतदानाचा हक्क बजावत आहेत. यामध्ये बनवडी आणि खिरखिंडी गावातील सरपंच पद बिनविरोध आहेत. त्याचबरोबर खेड, सोनके, खामकरवाडी, सायगाव, जगतापवाडी, घिघेडी, रुई अशी सात गावाची बिनविरोध निवडणूक झाली आहे.

मतदान केंद्रावर कोरेगाव उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश किंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन सावंत, ५ पोलीस सहाय्यक निरीक्षक, पाच पोलीस उपनिरीक्षक पोलीस जवानांसह अधिकारीवर्ग, दंगा नियंत्रण पथक त्याचबरोबर अनेक तुकड्या निवडणूक गावातील मतदान केंद्रावर तैनात केल्या आहेत. कोरेगाव तालुक्यात बाळासाहेबांची शिवसेना असलेली शिंदे गटाचे आ. महेश शिंदे आणि विधान परिषदेचे आ. शशिकांत शिंदे यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे.

हेही वाचा : 

Back to top button