पुणे : गांजा विकणारा जेरबंद लाखाचा ऐवज जप्त | पुढारी

पुणे : गांजा विकणारा जेरबंद लाखाचा ऐवज जप्त

पुणे; पुढारी वृत्तसेवा : गांजा विक्री करण्यासाठी येरवड्यातील श्रमिकनगर येथे आलेल्या एकाला अमली पदार्थविरोधी पथकाने छापा टाकून जेरबंद केले असून, त्याच्याकडून 5 किलो गांजासह 1 लाख 10 हजार 900 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
संकेत सुनील साठे (वय 25, रा. सुनीलनगर, मोशी) असे जेरबंद केलेल्याचे नाव आहे. अमली पदार्थविरोधी पथक-2 चे पोलिस निरीक्षक सुनील थोपटे व त्यांचे सहकारी पेट्रोलिंग करीत होते.

त्या वेळी पोलिस कर्मचारी नितीन जगदाळे यांना एक व्यक्ती अमली पदार्थ विक्री करण्यासाठी टिंगरेनगर येथे येणार असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी छापा टाकून साठेला ताब्यात घेतले. ही कारवाई गुन्हे शाखेचे अप्पर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलिस उपायुक्त अमोल झेंडे, सहायक पोलिस आयुक्त नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली अमली पदार्थविरोधी पथक-2 चे पालिस निरीक्षक सुनील थोपटे, हवालदार संतोष देशपांडे, चेतन गायकवाड, बोमदांडी, रोकडे, पोलिस नाईक साहिल शेख, नितीन जगदाळे, अझीम शेख, दिनेश बस्टवाड यांच्या पथकाने केली.

Back to top button