Maheshwarastra : ब्रह्मोसनंतर भारताचे महेश्वरास्त्र; येत्या दीड वर्षात येणार लष्कराच्या भात्यात | पुढारी

Maheshwarastra : ब्रह्मोसनंतर भारताचे महेश्वरास्त्र; येत्या दीड वर्षात येणार लष्कराच्या भात्यात

पुढारी ऑनलाईन: ब्रह्मदेवाच्या नावाने ब्रह्मोसनंतर आता महादेवाच्या नावाने महेश्वरास्त्र (Maheshwarastra) हे दीर्घ पल्ल्याचे रॉकेट बनवले जात आहे. महेश्वरास्त्रात महादेवाने तिसरा डोळा उघडला तर तो काहीही आणि कुणालाही भस्म करू शकतो, अशी वदंता आहे.

शंकराच्या नावाने सध्या भारतात जे रॉकेट बनवले जात आहे, तेही शत्रूला भस्म करणारे आहे. या अस्त्राला देशी हिमास्त्रही म्हटले जात आहे. सोलर इंडस्ट्रीजच्या माध्यमातून हे महेश्वरास्त्र (Maheshwarastra) तयार केले जात आहे. महेश्वरास्त्राची संकल्पना आम्ही भगवान शिवाच्या अस्त्रावरून घेतली. या अस्त्राची ताकदही तशीच आहे.

महेश्वरास्त्र  ही एक गाईडेड रॉकेट सिस्टीम असून, त्याच्या दोन आवृत्त्या आम्ही तयार करणार आहोत. महेश्वरास्त्र-1 आणि महेश्वरास्त्र-2 अशी त्यांची नावे असतील.

हेही वाचा:

Back to top button