सांगली: मनोज जरांगे- पाटील यांच्या सभेची इस्लामपुरात जोरदार तयारी | पुढारी

सांगली: मनोज जरांगे- पाटील यांच्या सभेची इस्लामपुरात जोरदार तयारी

इस्लामपूर : पुढारी वृत्तसेवा :  मराठा आरक्षणासाठी लढा उभारणारे मनोज जरांगे-पाटील यांची शुक्रवारी (दि.१७) इस्लामपूर येथे जाहीर सभा होत आहे. सभेची जोरदार तयारी करण्यात आली असून सभेसाठी ७० ते ८० हजार मराठा बांधव उपस्थित राहतील, अशी माहिती सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. Manoj Jarange-Patil

येथील जयंत पाटील खुल्या नाट्यगृहात सायंकाळी ५ वाजता ही सभा होणार आहे. आरक्षणासाठी लोकांच्यात जनजागृती करण्यासाठी या सभेचे आयोजन केले आहे. सभेच्या ठिक‍ाणी ४५ हजार खुर्च्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. शिवाय छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा ते शाहूनगर या रस्त्याच्या दोन्ही बाजूल‍ाही खुर्च्या टाकण्यात येणार असून ११ स्क्रीन लावण्यात येणार आहेत. वाहन पार्कींगची १२ ठिकाणी सोय करण्यात आली आहे. ४० बाय ६० फुटाचे व्यासपीठ उभारण्यात आले आहे. Manoj Jarange-Patil

वाळवा तालुक्याच्या वतीने जरांगे- पाटील यांचे किणी टोल नाका येथे स्वागत करण्यात येणार आहे. तेथून भव्य मोटरसायक रँली क‍ाढण्यात येणार आहे. तालुक्यातील हजारो कार्यकर्ते या रँलीत सहभागी होणार ‍आहेत. वाघवाडी फाट्यावर स्वागत केले जाणार आहे. तेथून ते पंचायत समिती आवारातील क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्याला अभिवादन करणार आहेत. त्यानंतर तहसिल कार्यालय परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून सभास्थळी जाणार आहेत. पलूस, वाळवा, शिराळा तालुक्यातील सकल मराठा समाज, मराठा क्रांती मोर्चा सभेचे नियोजन करत आहेत.

हेही वाचा 

Back to top button