सांगली : पुणे-बेंगलोर महामार्गावर येलूर नजीक टेम्‍पोचा अपघात; वाहनांच्या रांगा | पुढारी

सांगली : पुणे-बेंगलोर महामार्गावर येलूर नजीक टेम्‍पोचा अपघात; वाहनांच्या रांगा

सांगली ; पुढारी वृत्‍तसेवा पुणे-बेंगलोर महामार्गावर येलूर नजीक यशवंत गार्डन हॉटेलजवळ आयशर टेम्पोला अपघात झाला. मालाने भरलेला आयशरद टेम्‍पो रस्‍त्‍यावर पलटल्‍याने ड्रायव्हर गंभीर जखमी झाला आहे. त्‍यामुळे या मार्गावर ट्रॅफिक जाम झाले आहे. दीपावलीच्या सणासुदीच्या निमित्‍ताने महामार्गावर प्रवाशी वाहनांची संख्या जास्‍त आहे. त्‍यातच या अपघातामुळे महामार्गावर वाहतूक संथ झाली आहे. पोलिसांकडून एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे, मात्र अद्यापही वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.

हेही वाचा :

Back to top button