सांगली : दुधगावमध्ये कर्मवीरांच्या पुतळ्याचे उद्या लोकार्पण | पुढारी

सांगली : दुधगावमध्ये कर्मवीरांच्या पुतळ्याचे उद्या लोकार्पण

दुधगाव; पुढारी वृत्तसेवा :  मिरज तालुक्यातील दुधगाव येथील कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुतळ्याचे लोकार्पण मंगळवारी (दि. 15) सायंकाळी सात वाजता माजी मुख्याध्यापक यशवंत आकाराम कोले यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती संदीप आडमुठे, कैलास आवटी, सुनील पाटील यांनी दिली.

ते म्हणाले, दुधगाव ही कर्मवीर भाऊराव पाटील यांची कर्मभूमी आहे. कर्मवीरअण्णा यांच्यामुळे दुधगावला शिक्षकांचे गाव म्हणून ओळख मिळाली. दुधगावमध्ये कर्मवीर अण्णांचा पूर्णाकृती पुतळा 1987 मध्ये बसविण्यात आला होता. 35 वर्षांनंतर पुतळा सुशोभीकरणासाठी रयत शिक्षण संस्थेचे आजी-माजी शिक्षक, आजी-माजी विद्यार्थी, विविध स्थानिक संस्था व लोकसहभागातून काम सुरू केले. या सुशोभीकरणासाठी सुमारे 18 लाख खर्च अपेक्षित आहे. हे काम दसर्‍याला सुरू केले होते. फक्त नऊ महिन्यांत काम पूर्ण झाले आहे.
ते म्हणाले, यामध्ये रयत शिक्षण संस्थेचे ब्रीदवाक्य आणि वटवृक्ष हे चिन्ह पुतळ्याच्या पाठीमागे लावले आहे. तसेच पुतळ्याच्या मागे कारंजा बसविला आहे. चारही बाजूने स्टीलचे ग्रील बसविले आहे. आकर्षक विद्युत रोषणाई केली आहे. सुशोभीकरणाचे काम उत्कृष्ट झाले आहे.

Back to top button