सांगली : पाण्यासाठी सावळजच्या शेतकऱ्यांचा रास्ता रोको; बिरणवाडी फाट्यावर चक्का जाम | पुढारी

सांगली : पाण्यासाठी सावळजच्या शेतकऱ्यांचा रास्ता रोको; बिरणवाडी फाट्यावर चक्का जाम

तासगाव : पुढारी वृत्तसेवा विसापूर – पुणदी योजनेचे सिद्धेवाडी तलावात सोडलेले पाणी अचानक बंद केल्यामुळे संतप्त झालेल्या सावळजच्या शेतकऱ्यांनी बिरणवाडी फाटा येथे तासाभरापासून रस्ता रोको केला आहे. या चक्काजामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. जोपर्यंत संबंधित योजनेचे अधिकारी रास्ता रोकोच्या ठिकाणी येत नाहीत, तोपर्यंत या ठिकाणावरून उठणार नाही, असा आक्रमक पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला आहे.

पुणदी योजनेचे पाणी सावळजला सोडण्यात आले होते. मात्र एका नेत्याच्या सांगण्यावरून अवघ्या काही तासात हे पाणी बंद करण्यात आले. त्यामुळे सावळज भागातील शेतकरी संतप्त झाले आहेत. पाण्याच्या बाबतीत राजकारण केले जात आहे. अधिकारी नेत्यांच्या सांगण्यावरून पाणी बंद करत आहेत. पाण्याच्या बाबतीत केले जाणारे राजकारण खपवून घेणार नाही, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.

बंद केलेले पाणी तातडीने सुरू करावे, या मागणीसाठी सावळज शेतकऱ्यांनी बिरणवाडी फाट्याजवळ सुमारे तासाभरापासून रास्ता रोको सुरू केला आहे. जोपर्यंत अधिकारी येत नाहीत, तोपर्यंत रस्त्यावरुन हटणार नाही, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.

हेही वाचा : 

Back to top button