सांगली: बेडग येथे कालव्यात दोन तरुण बुडाले | पुढारी

सांगली: बेडग येथे कालव्यात दोन तरुण बुडाले

सांगली: पुढारी वृत्तसेवा: मिरज तालुक्यातील बेडग येथे म्हैसाळ योजनेच्या मुख्य कालव्यात दोघे बुडाले. सलमान शौकत तांबोळी (वय 21) आणि आरमान हुसेन मुलाणी (वय 16) अशी त्यांची नावे आहेत. तर नदीम फिरोज मुलानी (वय 18) या तरुणाला बुडताना वाचविण्यात यश आले आहे. ही घटना आज (दि. ४) दुपारी घडली. बुडालेले दोघेही सेंट्रींग कामगार असून माधवनगर येथे राहत होते.

म्हैसाळ योजनेच्या कालव्यात दोघे पोहण्यासाठी उतरले होते. परंतु मुख्य कालव्यात पाण्याचा वेग प्रचंड असल्याने दोघेही बुडाल्याची प्राथमिक माहिती मिळाली. आयुष हेल्पलाइन व मिरज ग्रामीण पोलिसांकडून बुडालेल्या तरुणाचा शोध घेत आहे.

हेही वाचा 

Back to top button