‘पुढारी’च्या नावाने व्हायरल ओपिनियन पोल बोगस | पुढारी

‘पुढारी’च्या नावाने व्हायरल ओपिनियन पोल बोगस

सांगली; पुढारी वृत्तसेवा : दैनिक ‘पुढारी’च्या नावाने समाजमाध्यमांतून बोगस ‘ओपिनियन पोल’ व्हायरल झाला आहे. पुढारीने अशाप्रकारचा ‘ओपिनियन पोल’ घेतलेला नाही.

समाजमाध्यमांत काही बोगस ओपिनियन पोल, बोगस अंदाज व्हायरल होत आहेत. जिल्हा प्रशासनाने ही बाब गांभीर्याने घेऊन संबंधितांवर कारवाई करणे आवश्यक आहे. दैनिक पुढारीचा लोगो वापरून अज्ञातांनी बोगस ओपिनियन पोल समाजमाध्यमात मोठ्या प्रमाणावर व्हायरल केला आहे. दैनिक पुढारीच्या वाचकांनी व जनतेने या बोगस ओपिनियन पोलवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन दै. पुढारी व्यवस्थापनाने केले आहे.

Back to top button