जत तालुक्‍यात वादळी वारा, गारपीटसह पावसाचे थैमान | पुढारी

जत तालुक्‍यात वादळी वारा, गारपीटसह पावसाचे थैमान

जत (जि.सांगली), पुढारी वृत्तसेवा : जत शहरासह तालुक्यातील शुक्रवारी (दि.15) दुपारी चारच्या सुमारास पावसाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्‍यान काही भागात गारपीट, वादळी वारे व अवकाळी पावसाच्या तडाख्याने मोठे नुकसान झाले आहे. तसेच शहरात गारांचा पाऊस पडला.

याबाबत मिळालेल्‍या माहितीनुसार, वादळी वाऱ्याने तालुक्यातील अनेक गावात विजेचे खांब कोसळले आहेत. तर अनेक घराची पत्रे उडून गेली आहेत. विजापूर रोडवर सुपर सर्कस सुरू होती. या वादळी वाऱ्याने सुपर सर्कसचे मोठे नुकसान झाले आहे. तर सर्कसचा पूर्ण तंबू उखडून गेला आहे आणि सर्कसचे 15  ते 20 लाखांचे नुकसान झाले आहे. मागील दोन वर्षांपासून कोरोनामुळे सर्कस बंद होत्‍या. यावर्षी प्रथमच सर्कस मालकाने सर्कस सुरु केल्‍या परंतु वादळी वाऱ्याने पुन्हा एकदा मोठे नुकसान झाले आहे.

हेही वाचलं का 

Back to top button