रायगड : आदिवासी कातकरी शेतकऱ्यांचा मंत्रालयावर मोर्चा | पुढारी

रायगड : आदिवासी कातकरी शेतकऱ्यांचा मंत्रालयावर मोर्चा

पनवेल; विक्रम बाबर : पनवेल तालुक्यातील वळीवली गावातील आदिवासी बांधव कसत असलेल्या जमिनीवर सिडकोने आपला हक्क सांगून आदिवासी बांधवांच्या हक्काच्या जमिनीवर डल्ला मारण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे संतापलेल्या आदिवासी शेतकऱ्यांनी आज (दि.६) रस्त्यावर उतरून सिडको प्रशासनाचा निषेध केला आणि आमच्या हक्काच्या जमिनी आम्हाला परत द्या, अशी मागणी करत शेतकऱ्यांनी मोर्चा काढला.

खांदा कॉलनी येथून मोर्चा काढून हा मोर्चा  मंत्रालयावर धडकणार आहे. या मोर्चासाठी जवळपास १५० ते २०० कुटूंब मोर्चात सहभागी झाले होते. गेल्या ५० वर्षाहून अधिक काळ वळवली येथील शेत जमिनी आम्ही कसत आहोत, या शेतजमिनीवर पिकत असलेल्या रानभाज्या तसेच अन्य उत्पादनावर आमच्या कुटूंबाचे पोट चालत होते. मात्र आता सिडकोने या जमिनीवर हक्क सांगून आम्हाला बेघर करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे आम्हाला आमच्या जमिनी परत द्या, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

हेही वाचा : 

Back to top button