रायगड: जिल्ह्यात ३२.४२ टक्के पाणीसाठा उपलब्ध, धरणक्षेत्रात १० टक्केपेक्षा कमी पाणी | पुढारी

रायगड: जिल्ह्यात ३२.४२ टक्के पाणीसाठा उपलब्ध, धरणक्षेत्रात १० टक्केपेक्षा कमी पाणी

रोहे महादेव सरसंबे

रायगड जिल्ह्यात वाढत्या उष्णतेमुळे दिवसेंदिवस धरणक्षेत्रातील पाणीसाठा कमी होताना दिसत आहे. रायगड जिल्ह्यातील २८ धरणक्षेत्रात ३२. ४२ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. हा पाणीसाठा गेल्या वर्षापेक्षा २ टक्क्यांनी कमी आहे. गेल्यावर्षी ( मे २०२३ ) याच दिवशी ३४.१४ टक्के पाणीसाठा उपलब्ध होता.

रायगड जिल्ह्यात सर्वात कमी ३ धरण क्षेत्रात १० टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. यामध्ये जिल्ह्यात सर्वात कमी पाणीसाठा फणसाड ६ टक्के, श्रीगांव ६ टक्के व कोथुर्डे धरणक्षेत्रात ८ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. तर सर्वात जास्त पाणीसाठा पेण तालुक्यातील आंबेघर धरणक्षेत्रात ७१ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. दिवसेंदिवस उष्णतेमुळे पाणीसाठा जिल्ह्यातील कमी होताना दिसत आहे त्यामुळे पाण्याची बचत करणे आवश्यक आहे. अद्याप पावसाळा सुरू होण्यासाठी एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी शिल्लक आहे.

रायगड जिल्ह्यातील २८ धरण क्षेत्रातील पाणीसाठा पाहता यामध्ये प्रामुख्याने मुरुड तालुक्यातील फणसाड धरणक्षेत्रात ६ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. तळा तालुक्यातील वावा धरणक्षेत्र-४६ टक्के, रोहा तालुक्यातील सुतारवाडी धरणक्षेत्र-३४ टक्के , पेण तालुक्यातील आंबेघर धरणक्षेत्र ७१ टक्के, अलिबाग तालुक्यातील श्रीगांव धरणक्षेत्रात ६ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. तसेच सुधागड तालुक्यातील कोंडगाव धरणक्षेत्र-११ टक्के, घोटवडे धरणक्षेत्र-१५ टक्के, ढोकशेत धरणक्षेत्र-१५ टक्के, कवेळे धरणक्षेत्र-२२ टक्के, उन्हेरे धरणक्षेत्र-१६ टक्के, श्रीवर्धन तालुक्यातील कार्ले धरणक्षेत्र-४५ टक्के, कुडकी धरणक्षेत्र-५९ टक्के, रानीवली धरणक्षेत्र-२६ टक्के, म्हसळा तालुक्यातील पाभरे धरणक्षेत्र-३९ टक्के, संदेरी धरणक्षेत्र-५९ टक्के, महाड तालुक्यातील वरंद धरणक्षेत्र-३८ टक्के, खिंडवाडी धरणक्षेत्र-३२ टक्के, कोथुर्डे धरणक्षेत्र-८ टक्के, खैरे धरणक्षेत्र-२९ टक्के, कर्जत तालुक्यातील साळोख धरणक्षेत्र-३४ टक्के पाणीसाठा उपलब्ध, अवसरे धरणक्षेत्र-१८ टक्के पाणीसाठा, खालापूर तालुक्यातील भिलवले धरणक्षेत्र-३८ टक्के, कलोते मोकाशी धरणक्षेत्र-२६ टक्के, डोणवत धरणक्षेत्र-१८ टक्के, पनवेल तालुक्यातील मोरबे धरणक्षेत्र-४४ टक्के, बामणोली धरणक्षेत्र-४९ टक्के, उसरण धरणक्षेत्र-७० टक्के, उरण तालुक्यातील पुनाडे धरणक्षेत्र-३४ टक्के इतका पाणीसाठा उपलब्ध आहे.

Back to top button