नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : पद्मश्री पुरस्कार विजेते शंकर बाबा पापळकर यांचा दिल्लीत आज गुरूवारी सत्कार करण्यात आला. राजधानी दिल्लीत 'पुढचं पाऊल' या संस्थेतर्फे पद्मश्री पुरस्कार विजेते शंकरबाबा पापळकर यांच्या सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी क्रीडा सचिव सुजाता चतुर्वेदी यांच्या हस्ते शंकरबाबा पापळकर यांचा सत्कार करण्यात आला.
महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते शंकरबाबा पापळकर यांना यंदा पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला. आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण होणार आहे. विकलांग- दिव्यांग- मतिमंद मुलांचे संगोपन या सामाजिक कार्यासाठी पापळकर यांना २६ जानेवारीच्या पूर्वसंध्येला पुरस्कार जाहीर झाला होता.
पद्म पुरस्कार सोहळ्याच्या पूर्वी 'पुढचं पाऊल'तर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शंकरबाबा पापळकर यांच्यासह त्यांचे मानसपुत्र योगेश आणि मानसकण्या गांधारी यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. या सत्कार सोहळ्यासाठी दिल्लीतील वरीष्ठ प्रशासकीय अधिकारी आनंद पाटील, राजीव मित्तल यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
हेही वाचा