पनवेल: मानसरोवर रेल्वे स्थानक परिसरात ४२ दुचाकींना आग | पुढारी

पनवेल: मानसरोवर रेल्वे स्थानक परिसरात ४२ दुचाकींना आग

पनवेल, पुढारी वृत्‍तसेवा : मानसरोवर रेल्वे स्थानकाच्या शेजारी पार्कींग करण्यात आलेल्या 42 हुन अधिक दूचाकींना आग लागण्याची घटना समोर आली आहे. ही आग एवढी भयानक होती की पार्कींगमधील तब्‍बल 42 गाड्या जळून खाक झाल्या, तर 3 ते 4 गाड्या या अर्धवट अवस्थेमध्ये जळल्या आहे.

या आगीची माहिती मिळाल्यानंतर सिडकोच्या अग्निशमन दलाच्या जवान घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्‍यात आणली, अन्यथा 50 पेक्षाही अधिक गाडया या आगीत जळाल्‍या असत्‍या असा अंदाज व्यक्‍त करण्यात येत आहे. मानसरोवर रेल्वे स्थानकाच्या शेजारी प्लॅटफॉर्मला चिटकून या गाड्या नो पार्कींग झोनमध्ये होत्या.

दरम्‍यान, ही आग याच परिसरातील एका समाजकंटकाने लावल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. तसेच एका अज्ञात इसमाला गाडीवर पेट्रोल टाकताना रेल्वे कर्मचा-याने बघितल्याची चर्चा सध्या या परिसरात सुरू आहे. ही आग कशी लागली यांचा शोध पनवेल रेल्वे पोलीस घेत आहे.

हेही वाचा  

नागपूर : सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता प्रकरणी ४१ लाखांचा दंड वसूल

कारवाईमुळे मालमत्ता हडपण्याला लगाम, सर्वसामान्यांना दिलासा; पालकमंत्र्यांकडून दखल

कारवाई होणार नसेल तर महाराजांचे नाव घेता कशाला?: उदयनराजे भोसले; 3 डिसेंबरला आक्रोश मेळावा

Back to top button