नागपूर : सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता प्रकरणी ४१ लाखांचा दंड वसूल | पुढारी

नागपूर : सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता प्रकरणी ४१ लाखांचा दंड वसूल

नागपूर; पुढारी वृत्तसेवा: नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, ५० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाईची सुरुवात केली आहे. शहरात ११ ऑक्टोबर ते २७ नोव्हेंबर या दरम्यान ८ हजार ६३९ प्रकरणाची नोंद करण्यात आली आहे. त्यांच्याकडून ४१ लाख ८२ हजार ५०० इतक्या रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. उपद्रव शोध पथकाने रविवारी (२७) १०० प्रकरणांची नोंद करून ४५९०० रुपयाचा दंड वसूल केला.

शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी रस्त्यावर, फुटपाथवर कचरा टाकणारे, थुंकणारे, घाण करणारे, लघुशंका करणारे, प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या नागरिकांवर तसेच दुकानदारांवर दंडात्मक कारवाई सुरु करण्यात आलेली आहे. उपद्रव शोध पथकाच्या जवानांनी रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर ५ प्रकरणांची नोंद करून १००० रुपयांचा दंड वसूल केला. सगळयांवर प्रत्येकी २०० प्रमाणे दंड लावण्यात आला. मनपा आयुक्त आणि प्रशासक राधाकृष्णन बी यांचे मार्गदर्शनात उपद्रव शोध पथकाचे प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात ही कारवाई विविध झोननिहाय करण्यात आली.

हेही वाचलंत का? 

Back to top button