..त्यांना मोकळ्या झोळीने पाठवायचे : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले | पुढारी

..त्यांना मोकळ्या झोळीने पाठवायचे : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले

पुणे : महाराष्ट्रातील कांद्याला बंदी, मात्र गुजरातमध्ये परवानगी. मग नरेंद्र मोदी हे केवळ गुजरातचे पंतप्रधान आहेत का? महाराष्ट्राला बेरोजगार करण्याचे काम भाजप सरकार करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मोकळी झोळी घेऊन आले होते. आता त्यांना पुन्हा तशीच मोकळी झोळी घेऊन माघारी पाठवायचे असल्याची टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मंगळवारी केली. महाविकास आघाडीकडून वारजे येथे आयोजित केलेल्या उदेवारांच्या प्रचारसभेत पटोले बोलत होते. “मोदी सभेसाठी आल्यानंतर रस्त्यावरही वाहतूक कोंडी आणि हवेतदेखील कोंडीचा फटका बसतो.

मोदी आल्यानंतर शंभर किलोमीटर हवाई अंतर बंद केले जात आहे, हा केवळ सत्तेचा माज असल्याची,” टीकाही पटोले यांनी केली. “मोदी-शहा सरकारने लोकशाही सरकार संपविण्याचा प्रयत्न केला, तेव्हा महाराष्ट्राने एल्गार पुकारला असल्याचेही” पटोले म्हणाले. खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, तुतारी दिल्लीच्या तख्ताच्या विरोधात वाजवायची असून महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचारमुक्त भारत निर्माण करायचा आहे. आता नवीन यंत्रणा सुरू केली आहे, पदाधिकार्‍यांना फोन येतात. पण, इथला एकही पदाधिकारी फोनला घाबरलेला नाही. प्रलोभने दिली, धमक्या दिल्या, तरी पवारसाहेब आणि उद्धव ठाकरे यांच्या मागे उभे राहिलेत.

हेही वाचा

Back to top button