महायुतीच्या रॅलीने वाहतुकीत बदल; असा आहे बदल | पुढारी

महायुतीच्या रॅलीने वाहतुकीत बदल; असा आहे बदल

पुणे : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे आणि शिरूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आज (दि.25) अर्ज दाखल करण्यापूर्वी सकाळी साडेनऊ ते साडेबारादरम्यान रॅली काढणार आहेत. ही रॅली शिवाजी पुतळा, कर्वेनगर ते छत्रपती संभाजी पुतळा, डेक्कनदरम्यान होणार आहे. कर्वे रोड, डेक्कन परिसर, जंगली महाराज रस्ता, टिळक चौक परिसरामध्ये तात्पुरत्या स्वरूपात बदल करण्यात आले असल्याची माहिती उपायुक्त रोहिदास पवार यांनी दिली.

असा आहे बदल

1) कर्वे रस्ता – नळ स्टॉप चौक ते खंडोजीबाबा चौकदरम्यान कर्वे रस्ता वाहतुकीस बंद राहील.

  • -पर्यायी मार्ग : पौड, कर्वे रस्त्यावरून येणारी वाहने स्वारगेट परिसरामध्ये जाण्यासाठी नळ स्टॉप – म्हात्रे पूल – सेनादत्त चौकी चौक मार्गे जातील
  •  पौड, कर्वे रस्त्यावरून वाहने डेक्कन, शिवाजीनगर परिसराकडे जाण्यासाठी पौड फाटा, आठवले चौक, लॉ कॉलेज रस्त्याने जातील.

2) खंडोजीबाबा चौक व टिळक चौक

  •  जंगली महाराज रस्त्याने खंडोजीबाबा चौकमार्गे जाणारी वाहने कर्वे, पौड रस्त्याकडे जाण्यासाठी स. गो. बर्वे चौक, सिमला ऑफिस गणेशखिंड रस्त्याने एस. बी. जंक्शनवरून एस.बी. रस्त्याने नळस्टॉप चौक मार्गे जावे.
  • स्वारगेटकडे जाण्यासाठी स. गो. बर्वे चौक येथून शिवाजी रस्त्याने गाडगीळ पुतळा, जेधे चौक मार्गे जातील.

हेही वाचा

Back to top button