श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळाप्रमुखांची निवड | पुढारी

श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळाप्रमुखांची निवड

देहूगाव : पुढारी वृत्तसेवा : संत तुकाराम महाराज आषाढी पायी वारी पालखी सोहळ्याचे शुक्रवार (दि. 28) जून रोजी श्रीक्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे. जगद्गुरू संत तुकाराम महाराज 339 वा आषाढी पायी वारी सोहळ्यानिमित्त जगद्गुरू संत तुकाराम महाराज संस्थान ची बैठक संस्थांचे अध्यक्ष ,विश्वस्त यांची नुकतीच बैठक झाली. या बैठकीत यंदाच्या पालखी सोहळ्याचे प्रमुख म्हणून हभप विशाल महाराज मोरे, हभप संतोष महाराज मोरे आणि हभप माणिक महाराज मोरे यांची एकमताने निवड करण्यात आली.

या बैठकीस संस्थांनचे अध्यक्ष हभप पुरुषोत्तम महाराज मोरे, हभप संजय महाराज मोरे, हभप भानुदास महाराज मोरे आणि हभप अजित महाराज मोरे आदी उपस्थित होते. जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज 339 व्या आषाढी पायी वारीचे श्रीक्षेत्र देहूगाव येथून शुक्रवार (दि. 28) जून (ज्येष्ठ कृष्ण सप्तमी) दुपारी 2 वाजता श्रीक्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे. त्या अनुषंगाने देहू देवस्थान संस्थांनच्या वतीने पालखी प्रस्थान सोहळ्याची पूर्व तयारी करण्यात येत आहे.एकूणच वारकरी भाविक भक्तांमध्ये चैतन्य निर्माण करणारा पालखी प्रस्थान सोहळ्यावेळी वारकरी, भाविक-भक्तामध्ये उत्साह असतो. श्री संत तुकाराम महाराज हा उत्साह या अभंगातून वर्णन करतात..
पंढरीस जाय । तो विसरे बापमाय। अवघा होय पांडुरंग। राहे धरूनिया अंग ॥धृ॥
न लगे धन मान। देह भावे उदासिन ॥3॥ तुका म्हणे मळ । नाशी तत्काळ ते स्थळ ॥4॥

हेही वाचा

Back to top button