बोगस कागदपत्रांद्वारे पारगाव-केडगाव रस्ता काम | पुढारी

बोगस कागदपत्रांद्वारे पारगाव-केडगाव रस्ता काम

केडगाव : पुढारी वृत्तसेवा : बोगस कागदपत्रांच्या आधारे सुरू असलेल्या पारगाव- केडगाव रस्त्याचे काम तातडीने बंद करा आणि रस्ता उखडून ठेवलेल्या निखिल कन्ट्रक्शन या ठेकदार कंपनीवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी धुळीच्या त्रासाने वैतागलेले रहिवासी करू लागले आहेत. रस्त्याची रुंदीच वादात असल्याने सध्या या कंपनीकडून रस्ता रुंदीकरणासाठी लगतच्या शेतकर्‍यांच्या, रहिवाशांच्या जमिनीवर दहशत, दडपशाहीने कब्जा करण्याचा प्रयत्न सुरू आहे. 304.68 लक्ष रुपयांच्या या रस्त्याचे चौपदरीकरणासह सिमेंट काँक्रीटीकरणाचे काम सध्या पुण्यातील मे. निखिल कन्ट्रक्शन कंपनी करीत आहे. कंपनीने 22 फेवारी 2023 रोजी कामाची सुरुवात केली आहे. काम पूर्ण करण्यासाठी 18 महिन्यांची मुदत आहे.

उपजिल्हाधिकारी भूसंपादन क्रमांक 17 यांनी दिलेल्या माहितीवरून पारगाव ते चौफुला रस्ता किती रुंद होणार हे उमगत नसल्याने हा मोठा प्रश्न बनला आहे. या विभागाचे उपजिल्हाधिकारी डी. पी. शिळीमकर यांनी जावक क्रमांक 17 58/2023 दि. 9/8/23 चे माहिती अधिकारी पत्राला उत्तर देताना ‘राज्य मार्ग 118 जुना 68 यांचे कार्यालयाचे संपादन अवॉर्ड व मोजणी अभिलेख कार्यालयीन अभिलेखांवर दिसून येत नाही’ असे उत्तर दिले आहे. रस्त्याच्या रुंदीकरणाचे मोजमापच सरकार दरबारी नसल्याने ठेकेदार कंपनीचे काम कशाच्या आधारे सुरू आहे, हा मोठा प्रश्न निर्माण झालेली आहे.

हेही वाचा :

Back to top button