सावित्रीबाई फुले अभिवादन : स्मारक निर्माण समितीच्या वतीने मिरवणूक | पुढारी

सावित्रीबाई फुले अभिवादन : स्मारक निर्माण समितीच्या वतीने मिरवणूक

पुणे : पुढारी वृत्तसेवा : जानेवारी 1848. महात्मा जोतिराव व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी या दिवशी भारतातील मुलींची पहिली शाळा सुरू केली. स्त्रीमुक्तीच्या पहाटेच्या घटनेला 175 वर्षे झाली. त्यानिमित्त ’मुलींची पहिली शाळा सार्वजनिक स्मारक निर्माण समिती’च्या वतीने भव्य अभिवादन मिरवणूक आयोजित करण्यात आली होती. विविध प्रांतांतील मुली व महिलांचा सहभाग आणि त्या प्रांताच्या भाषेत ’जोतिबा आणि सावित्री आम्ही कृतज्ञ आहोत’ असे फलक घेतलेल्या स्त्रिया, अशा भव्य स्वरूपातील मिरवणुकीने नववर्षाची पहिली सकाळ भारून टाकली होती.

विविध संस्था व संघटनांच्या शेकडो स्त्रिया यात सहभागी झाल्या होत्या. भिडेवाडा या मुलींच्या पहिल्या शाळेचे राष्ट्रीय स्मारक करण्याचा मार्ग न्यायालयाच्या निर्णयाने मोकळा झाला. याविषयी आनंद व्यक्त करण्यासाठी आणि मुलींची पहिली शाळा सुरू करणारे फुले दाम्पत्य, फातिमा शेख, शाळेसाठी जागा आणि देणगी देणारे तात्याराव भिडे, सावित्रीबाईंना शाळेत जाण्यासाठी संरक्षण देणारे लहुजी वस्ताद साळवे व स्त्री शिक्षण सुरू होण्यासाठी तसेच त्याचा प्रसार करण्यासाठी योगदान देणार्‍या सर्वांना अभिवादन करण्याकरिता मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते.

हेही वाचा

Back to top button